एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Entertainment News Live Updates 16 March : 'घर बंदूक बिरयानी' चा ट्रेलर रिलीज; नागराज आणि सयाजी शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 16 March :  'घर बंदूक बिरयानी' चा ट्रेलर रिलीज; नागराज आणि सयाजी शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Hunter : अन्ना इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर'चा ट्रेलर रिलीज, पुन्हा दिसणार अॅक्शन मोडमध्ये

Suniel Shetty Hunter Web Series : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे. पण आता आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या आगामी 'हंटर' (Hunter) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'हंटर'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. थरार-नाट्य आणि अॅक्शनचा तडका असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. 

'हंटर' या वेबसीरिजमध्ये सुनील शेट्टी, राहुल देव आणि ईशा देओल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये ईशा देओलच्या भूमिकेची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. 'हंटर-टूटेगा नहीं तोडेगा' असे ट्रेलरमधील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर 22 मार्चपासून पाहता येणार आहे.

Honey Singh : हनी सिंहवर येणार डॉक्युमेंट्री; वाढदिवशी स्वत:चं केली घोषणा

Honey Singh Documentary : लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट्री होणार रिलीज!

हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाणं गात असून चाहते त्याला दाद देताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे, "माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे". 

15:20 PM (IST)  •  16 Mar 2023

Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीपच्या आईची होणार एन्ट्री; अतिशा नाईक साकारणार ‘मंगल’ ही भूमिका

Sukh Mhanje Nakki Kay Asta:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta)  मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी मंगल या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास 30 वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झालीय. सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. मंगल म्हणजे जयदीपची आई. 30 वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरवलं आहे. मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhakti Ratnaparkhi official (@bhakti_ratnaparkhi)

12:27 PM (IST)  •  16 Mar 2023

Ghar Banduk Biryani Trailer: नागराज, सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर आकाश आणि सायलीचा रोमँटिक अंदाज; 'घर बंदूक बिरयानी' चा ट्रेलर पाहिलात?

Ghar Banduk Biryani Trailer: सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी'. मुळात नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित  'घर बंदूक बिरयानी' प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

09:59 AM (IST)  •  16 Mar 2023

Divya Khosla Kumar Injured: शूटिंगदरम्यान दिव्या खोसला कुमार जखमी; फोटो शेअर केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'आम्हाला रोज...'

Divya Khosla Kumar Injured : दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. तिने काही अल्बममध्ये काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील तिने केलं आहे. सध्या दिव्या ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दिव्या ही तिच्या एका प्रोजोक्टच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. दिव्याच्या गालावर दुखपत झाली असून तिने या दुखापतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो दिव्याने शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

09:58 AM (IST)  •  16 Mar 2023

Sonali Kulkarni : 'भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत'; सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं सोशल मीडिया होतंय कौतुक

Sonali Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनालीच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. आहे. नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Embed widget