Entertainment News Live Updates 14 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Sep 2022 11:32 PM
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणीत वाढ

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने (आज) 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन आज न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी सुरू होती.



Bhaubali : प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी 'भाऊबळी' सज्ज

Bhaubali : गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' (Bhaubali) हा एक धमाल विनोदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात विनोदवीरांची फौज असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चं घर यंदा असेल का निर्बंधमुक्त?

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना त्यांचा लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. पण आता बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

यवतमाळमध्ये खासदार राणा विरोधात सेवानिवृत्त पोलीस आक्रमक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, तसेच गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी- कर्मचारी संघटना यवतमाळमध्ये आक्रमक झाली आहे. 

Hariom : 'हरिओम' चा लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज

Hariom :  महाराष्ट्राचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे  सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची  कथा मांडणारा 'हरिओम' (Hariom) हा चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Thank God Controversy : 'थँक गॉड' चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

Thank God Controversy : दिग्दर्शक इंद्र कुमार (Indra Kumar) यांचा आगामी चित्रपट थँक गॉड (Thank God) हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता  अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशचा बबली अंदाज; ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

Tejasswi Prakash :  ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातील तेजस्वीचा ‘फर्स्ट लूक’ रिलीज झाला आहे. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘श्रुती’ असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.



Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा अविनाशला अडकवणार जाळ्यात

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नव-नवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या यश-नेहा आणि नेहा-परीमध्ये अविनाशमुळे दुरावा आला आहे. आता नेहा अविनाशला जाळ्यात अडकवणार आहे. 

गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!

आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. आणि फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे.


 


पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’, चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीझर लाँच!

आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem Mhanje Kay Asat)  या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


 


Kamaal Rashid Khan : 'दहा दिवस फक्त पाणी प्यायलो, दहा किलो वजन झाले कमी'; केआरकेनं सांगितला कारागृहात असतानाचा अनुभव

Kamaal Rashid Khan : कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेला काही दिवसांपूर्वी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी आणि चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. जवळपास दहा दिवसांनी केआरकेला जामीन मिळाला. दहा दिवसांमध्ये कारागृहात आलेला अनुभव केआरकेनं (KRK) एक ट्वीट शेअर करुन सांगितला. या ट्वीटमध्ये केआरकेनं कारागृहातील अनुभव सांगितला. 



Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : अखेर प्रतीक्षा संपली! 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची एन्ट्री; प्रोमो पाहिलात?

Taarak Mehta ka Ooltah Chashmah show :  अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारत होते. आता त्यांची भूमिका अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) हा साकारणार आहे. नुकताच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नव्या तारक मेहतांची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. 'कोण करत आहे गणपती बाप्पाची आरती? पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या नव्या एपिसोडमध्ये' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. या प्रोमो व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट केली आहे. 





Money Laundering Case : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी होणार

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आज दिल्लीत चौकशीसाठी हजर राहणार आहे. EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखा आज सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी करण्यात येणार आहे.


 





ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर आता चाहत्यांना 'ब्रह्मास्त्र 2'ची आतुरता!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्याची झलक बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आठवडा पूर्ण होण्याआधीच 200 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते ‘ब्रह्मास्त्र 2’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘ब्रह्मास्त्र 2 : देव’ (Brahmastra 2) या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 





हॅप्पी बर्थडे आयुष्मान खुराना!

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आज (14 सप्टेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच


‘द ग्रेट इंडियन किचन’ (The Great Indian Kitchen) या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनचं (Nimisha Sajayan) मराठीत पदार्पण होणारा चित्रपट म्हणून 'हवाहवाई'ची (Hawahawai) सध्या जोरदार चर्चा आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात असून, ‘हवाहवाई’ हा चित्रपट येत्या 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले.


'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! दमदार कलेक्शनमुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ!


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटानं ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 211 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सोमवारी (12 सप्टेंबर) सकाळी जेव्हा शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा पीव्हीआरच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. पीव्हीआरचे शेअर्स 5.10 टक्के वाढून 1928 रुपये पर्यंत पोहोचला.तर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. आयनोक्सच्या शेअर्समध्ये  5.40 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आयनॉक्सचा शेअर 4.30 टक्यांनी वधारत  515 रुपयांवर व्यवहार करत होता. तर पीव्हीआरचा शेअर 3.62 टक्क्यांनी वधारत 1900 रुपयांवर व्यवहार करत होता.


गोकुळधाम सोसायटीत नक्की कोण परतणार? निर्माते असित कुमार मोदींने दिले संकेत!


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. मात्र, सध्या ही मालिका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी सध्या मालिकेला रामराम ठोकला आहे. मात्र, आता यातील काही पात्र आता मालिकेत परत येणार आहेत. याचे संकेत स्वतः निर्माते असित कुमार मोदी यांनी दिले आहेत.


‘कॉमेडी किंग’ ओंकार भोजनेची नवी भरारी! आगामी चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार मुख्य भूमिकेत


छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.


लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाची पहिली पोस्ट; म्हणाला...


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट फ्लॉप ठरला. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. आता लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजयनं पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला विजयनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.