जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Maharashtra vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सर्व 11 जागांवर महायुतीने यश मिळविले आहे. निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 आमदार मुंबईला रवाना झाले असून, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. नव्या शासनात जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना नव्या सरकारमध्ये पुन्हा संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे अशा एकूण सात जणांची नावे चर्चेत आहेत. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे हेही स्पर्धेत आहेत, ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यातच लेवा पाटील समाजाचे असल्याने भाजपकडून त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. पाचोऱ्याचे किशोर पाटील हेही तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर किशोर पाटील हे सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे त्यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे.
जळगाव जिल्ह्यातून नेमकी कुणाला संधी?
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपमधील नवीन नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. अमित शाह यांच्या चाळीसगावमधील सभेत नव्या मंत्रिमंडळात चव्हाण यांना स्थान असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यातच चव्हाण हे फडणवीस व महाजन यांचेही निकटवर्तीय मानले जातात. भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जळगावचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे. आता जळगाव जिल्ह्यातून नेमकी कुणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ : सुरेश भोळे विजयी
सुरेश भोळे भाजप,
जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गट,
कुलभूषण पाटील अपक्ष,
डॉ. अनुज पाटील मनसे
जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन विजयी
गिरीश महाजन, भाजप
दिलीप खोडपे
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : गुलाबराव पाटील विजयी
गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट,
गुलाबराव देवकर
अमळनेर विधानसभा मतदारसंघ : अनिल पाटील विजयी
अनिल पाटील
शिरीष चौधरी अपक्ष
पाचोरा विधानसभा मतदारसंघ : किशोर पाटील विजयी
किशोर पाटील, महायुती
वैशाली सूर्यवंशी, ठाकरे गट
दिलीप वाघ, अमोल शिंदे अपक्ष
एरंडोल विधानसभा मतदारसंघ : अमोल पाटील विजयी
अमोल चिमणराव पाटील शिवसेना
सतीश पाटील, शरद पवार गट
चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनावणे विजयी
चंद्रकांत सोनवणे शिवसेना
प्रभाकर सोनवणे शिवसेना ठाकरे गट
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - मंगेश चव्हाण विजयी
मंगेश चव्हाण भाजप
उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गट
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील विजयी
चंद्रकांत पाटील, शिवसेना
रोहिणी खडसे शरद पवार गट
विनोद सोनवणे अपक्ष
भुसावळ विधानसभा मतदारसंघ : संजय सावकारे विजयी
संजय सावकारे भाजप
राजेश मानवतकर काँग्रेस
रावेर विधानसभा मतदारसंघ : अमोल जावळे विजयी
अमोल जावळे भाजप,
धनंजय चौधरी काँग्रेस
अनिल चौधरी प्रहार जनशक्ती पक्ष
शमिभा पाटील वंचित बहुजन आघाडी
आणखी वाचा