Gautam Gambhir Coming to India IND vs AUS 2nd Test : पर्थ कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी संबंधित आहे, जो भारतात परतत आहे. गंभीर अचानक भारतात का येत आहे, याचे कारण समोर आलेले नाही. मात्र यामागचे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितल्या जात आहे. आता प्रश्न असा आहे की, गंभीर भारतात परतल्यानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक कोण?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी पिंक बॉल टेस्ट असणार आहे. हा सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे खेळवला जाणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे गौतम गंभीर पिंक बॉल टेस्ट सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात परतणार आहे.
बीसीसीआयला दिली माहिती
बीसीसीआयशी संबंधित सूत्रांचा हवाला देत इंडियन एक्सप्रेसने लिहिले आहे की, गंभीरने भारतात परतल्याची माहिती दिली होती. दुसऱ्या कसोटीपूर्वी तो संघात सामील होईल, असेही सांगण्यात आले. त्यांनी परत येण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे.
पर्थमधील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आता कॅनबेराला जाणार आहे. 27 नोव्हेंबरला ती कॅनबेराला रवाना होईल, जिथे दोन दिवसीय पिंक बॉलचा सराव सामना खेळायचा आहे. शनिवारपासून हा सामना सुरू होणार आहे. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप हे प्रशिक्षण सत्रावर लक्ष ठेवतील.
भारतीय कर्णधार रोहित शर्माही वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. याच कारणामुळे तो पहिल्या कसोटीत खेळला नाही. रोहितचे वैयक्तिक कारण त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माशी संबंधित होते. मात्र, आता रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याने तिथे पिकअप बॉलसोबत सरावही सुरू केला.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -