एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 14 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 14 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

साजिद खानमुळे ‘बिग बॉस 16’ वादात! अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून सलमान खान आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

नेहमीप्रमाणेच यंदाचा ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) वादात अडकला आहे. निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याला स्पर्धक म्हणून घरात घेतल्याने या शोवर प्रचंड होत आहे. अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींवर लैंगिक शोषण केल्याचा अर्थात MeToo आरोप झाल्यानंतरही चित्रपट निर्माता साजिद खानला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून कास्ट केल्याबद्दल आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) कलर्स चॅनल आणि सलमान खानवर (Salman Khan) संतापली आहे. शर्लिन चोप्राकडून या शोच्या मेकर्सना आणि सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

दयाबेनला कॅन्सरची लागण? सुंदर अन् जेठालालनं दिली प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावरील  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी (Disha Vakani) . दिशा यांनी काही वर्षांपूर्वी हा शो सोडला. सध्या दिशा या चर्चेत आहेत. दिशा यांना कॅन्सरची लागण झाली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. आता मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि सुंदर ही भूमिका साकारणारा मयूर वकानी यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्पाल लांजेकरांनी चित्रपटाचा विषय बदलला? 'सुभेदार' च्या घोषणेनंतर चाहत्यांचा प्रश्न

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या शेर शिवराज, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच दिग्पाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'सुभेदार' (Subhedar) असं आहे. दिग्पाल यांनी सोशल मीडियावर सुभेदार या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले. पण दिग्पाल यांच्या या चित्रपटाचं पोस्टर पाहून अनेक नेटकऱ्यांना सध्या काही प्रश्न पडत आहेत.

'आधी इराणमध्ये आणि आता भारतात...'; उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

उर्वशीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती दु:खी दिसत आहे. व्हिडीओला उर्वशीनं कॅप्शन दिलं, 'आधी इराणमध्ये  माहसा अमिनी आणि आता भारतामध्ये.... माझ्यासोबत असंच होत आहे. ते मला स्टॅकर म्हणून चिडवत आहेत? कोणीही माझी काळजी घेत नाही किंवा मला पाठिंबा देत नाही. एक स्ट्रँग स्त्री ती असते जी प्रेम करते. ती हसते तसेच तिच्या डोळ्यांमधून अश्रू देखील येतात. ती स्वभावाने शांत आणि शक्तिशाली दोन्ही आहे, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे.  स्त्री ही जगाला मिळालेली एक भेट आहे.'

18:22 PM (IST)  •  14 Oct 2022

Mili Movie New Poster: जान्हवी कपूरच्या 'मिली' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Mili Movie New Poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor)  आगामी चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तिच्या मिली या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमधील जान्हवीच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. तिच्या  'मिली' या थ्रिलर चित्रपटचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

16:48 PM (IST)  •  14 Oct 2022

Malaika Arora: मलायकाच्या रॅम्प वॉकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, '150 रुपयांचा ड्रेस...'

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. नुकतीच मलायकानं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. या फॅशन वीकमध्ये मलायकानं रॅम्प वॉक देखील केला. फॅशन वीकसाठी मलायकानं एक खास लूक केला होता. तिच्या लूकला आणि रॅम्प वॉकला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

14:44 PM (IST)  •  14 Oct 2022

Bigg Boss Marathi 4: अमृता आणि तेजस्विनीमध्ये उडाले खटके; बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार?

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF असणाऱ्या अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि तेजस्विनीमध्ये (tejasvini lonkar)  वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

14:02 PM (IST)  •  14 Oct 2022

करण जोहरनं सिद्धार्थला विचारला प्रश्न; कियारा आडवाणीचं नाव घेताच अभिनेत्यानं दिली अशी रिअॅक्शन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. दोघेही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण अनेकदा हे लव्ह बर्ड्स एकत्र फिरताना आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसले आहेत. दोघेही पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत,असं म्हटलं जात आहे. नुकतीच सिद्धार्थनं  झलक दिखला जा (Jhalak Dikhhla Jaa) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सिद्धार्थला करण जोहरनं एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थनं हटके रिअॅक्शन दिली. 

 

14:01 PM (IST)  •  14 Oct 2022

‘अंगार...’; सई ताम्हणकरच्या बोल्ड फोटोशूटवर चाहते झाले फिदा!

मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget