Entertainment News Live Updates 14 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Nov 2022 04:49 PM
Salaam Venky: आई आणि मुलाच्या नात्याची कथा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Salaam Venky: अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा  (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 



Arbaaz Khan: 'सलमानचा भाऊ, मलायकाचा पती म्हटल्यावर...'; अरबाज खाननं व्यक्त केली खंत

Arbaaz Khan: प्रसिद्ध अभिनेता अरबाज खाननं (Arbaaz Khan) बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. वेगवेगळ्या चित्रपट, वेब सीरिजमधून अरबाज प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अरबाजनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. अरबाजनं सांगितलं की, मलायकाचा पती, सलमानचा (Salman Khan) भाऊ आणि सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा हे टॅग्स दिल्यावर त्याला वाईट वाटतं होतं.





Shabbas Sunbai : 'शाब्बास सुनबाई' नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

Shabbas Sunbai : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 





Sunil Shende Passed Away : सुनील शेंडे यांचं निधन

Sunil Shende Passed Away : मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. 

Sharad Ponkshe : आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा हेच दुर्देव : शरद पोंक्षे

Sharad Ponkshe On Bajirao Peshwa : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर ते त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता शरद पोंक्षे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) किती थोर होते हे सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, 'वजन कमी होणे, चिडचिड अन्... '

Nick Jonas: प्रसिद्ध गायक निक जोनास (Nick Jonas) हा सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव असतो. निक हा त्याच्या पत्नीसोबतचे म्हणजेच प्रियांका चोप्रासोबतचे (Priyanka Chopra) फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. तसेच अनेकवेळा तो मुलीचा फोटो देखील शेअर करतो. निक हा टाइप-1 मधुमेहाचा (Type 1 Diabetes) सामना करत आहे. आज जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) आहे. यानिमित्तानं निकनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं टाइप-1 मधुमेहाची त्याला जाणवलेली लक्षणे सांगितली. 



Raju Tulalwar : बाल प्रेक्षक घडवावा लागेल : राजू तुलालवार

Raju Tulalwar On Balnatya : बालप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न बालनाट्य करत असतात. गेल्या काही दिवसांत बालरंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार बालदिनानिमित्त एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,"बालरंगभूमी' मोठी मंडळी चालवत आहेत. ती हळू हळू लहान मुलांच्या ताब्यात द्यायला हवी. बालरंगभूमीवर काय सादर व्हावे हा निर्णय मुलांचा हवा. मोठ्यांच्या नियंत्रणातुन बालरंगभूमी मुक्त व्हायला हवी." 

Fatima Sana Shaikh: दंगल गर्ल फातिमा सना शेख करतेय 'या' आजाराचा सामना; चाहत्यांना दिली माहिती

Fatima Sana Shaikh:  बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. फातिमा सना शेख ही एपिलेप्सी या आजाराचा सामना करत आहे.  फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. 



RRR : 'RRR 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SS Rajamouli On RRR : 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला असून हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. देशभरात हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 900 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजामौलींनी (SS Rajamouli) दिली आहे. 





Joyland : 'ऑस्कर'साठी पाठवण्यात आलेल्या 'जॉयलँड' सिनेमावर पाकिस्तानात बंदी

Joyland Banned In Pakistan :  'जॉयलँड' (Joyland) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला पाकिस्तानकडून ऑफिशियल एन्ट्री मिळाली होती. अशातच या सिनेमाला पाकिस्तानने बंदी घातली आहे. हा सिनेमा येत्या 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. 

Siddhaanth Vir Surryavanshi: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाली, 'जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ..'

Alesia Raut Share Post For Siddhaanth Vir Surryavanshi: कुसुम (Kkusum), वारिस (Waaris) आणि सूर्यपुत्र कर्ण (Suryaputra Karn) यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर त्याची पत्नी एलेसिया राऊतनं (Alesia Raut) नुकतीच  एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.  



Subodh Bhave : 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला सात वर्ष पूर्ण; सुबोध भावेने केली नव्या सांगीतिक सिनेमाची घोषणा

Subodh Bhave On Katyar Kaljat Ghusali : 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आजही या सिनेमाचं गारूड प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने (Subodh Bhave) नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.



Childrens Day 2022 : 'तारे जमीन पर', 'मासूम'सह 'हे' सिनेमे 'बालदिनी' नक्की पाहा...

Childrens Day 2022 : आज देशभरात 'बालदिन' (Childrens Day 2022) साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी बालदिन जल्लोषात साजरा केला जातो. बालकांचा हक्काचा दिवस खास करण्यासाठी त्यांना 'मासूम' (Masoom) ते 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) हे सिनेमे नक्की दाखवा. त्यामुळे त्यांचं मनोरंजन होण्यासोबत प्रबोधनदेखील होईल. 

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर!

Ruchira Jadhav On Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण दिवसेंदिवस बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेतरी कमी पडतो आहे. दर आठवड्यात बिग बॉसच्या खेळात कोणाला तरी बाहेर पडावं लागत असतं. त्याप्रमाणे या आठवड्यात 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया अर्थात रुचिरा जाधवला (Ruchira Jadhav) घराबाहेर पडावं लागलं आहे. रुचिरा घराबाहेर पडल्याने आता रोहितचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या अफवा? 


सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) घटस्फोट घेणार अशा बातम्या असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा 'द मिर्झा मलिक शो' हा टीव्ही कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं होस्ट हे कपल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या अफवा होत्या का? किंवा हे सर्व काही या शोच्या प्रमोशनसाठी होतं का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. 


Jitendra Awhad Exclusive : शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल


Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 


अन्नासासाठी वनवन, फूटपाथवर झोपणं अन् त्वचेच्या रंगामुळे अपमान; मिथून चक्रवर्तींनी सांगितलं बॉलिवूड इंडस्ट्रीतील सत्य


मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले,"मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा एक वेळचं जेवण आणि कुठे झोपावं अशा गोष्टींचा विचार करावा लागत असे. कधी-कधी मी फूटपाथवरच झोपलो आहे. माझ्या आयुष्याची कथा, माझा संघर्ष कोणालाही प्रेरणा देणारा नाही. उलट मानसिक त्रास होईल. त्यामुळेच माझ्या आयुष्यावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही. 


'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी


गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत. आता लोकप्रिय बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील अनेक सिनेमांचं दिग्दर्शन राकेश यांनी केलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.