Entertainment News Live Updates 14 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Jan 2023 05:25 PM
Urfi Javed : बलात्कार, डान्सबार, कपड्यांवरुन एखाद्याला मारणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही; पोलीस चौकशीनंतर उर्फीचं ट्वीट

उर्फीने दुसरं ट्वीट केलं आहे,"बलात्कार, डान्सबार, कपड्यांवरुन एखाद्याला मारणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे. तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीबद्दल बोलत आहात?"





Makar Sankranti 2023 : Shilpa Shetty ते Arjun Kapoor; सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

Celebs Wishes Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. शिल्पा शेट्टीपासून (Shilpa Shetty) अर्जुन कपूरपर्यंत (Arjun Kapoor) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


Makar Sankranti 2023 : Shilpa Shetty ते Arjun Kapoor; सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Mazhi Tuzhi Reshimgath Marathi Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली असून आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 





Piccolo Official Trailer: राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते 'पिकोलो' चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Piccolo Official Trailer: जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ (Piccolo) हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  राजसाहेबांनी  चित्रपटाला  मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार उपस्थित होते.  फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ ह संगीतमय चित्रपट असून राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार

Shah Rukh Khan Pathaan Trailer On Burj Khalifa : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे. 





Uorfi Javed : अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेद चौकशीसाठी हजार

Uorfi Javed :  सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस दिली होती. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेद चौकशीसाठी हजार झाली आहे.  

Urfi javed : उर्फी जावेद आंबोली पोलीस स्टेशनला चौकशी साठी हजर

Urfi javed : उर्फी जावेद आंबोली पोलीस स्टेशनला चौकशी साठी हजर झाली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. 

Ved : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट!

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर या सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. 





Kuttey Box office Collection: 'कुत्ते' ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या कलेक्शन...

Kuttey Box office Collection:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा  'कुत्ते' (Kuttey) हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. पण आता या चित्रपटाचा ओपनिंग-डेचे कलेक्शन समोर आले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 



Akshaya Deodhar Makar Sankranti Special : काळी साडी, नाकात नथ, मंगळसूत्र, केसात गजरा; पाठकबाईंचा मकरसंक्रांत स्पेशल लूक पाहिलात का?

Akshaya Deodhar Hardeek Joshi Makar Sankranti Special Look : मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. अक्षयाची लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे. 





Rakhi Sawant: राखीनं शेअर केला व्हिडीओ

Rakhi Sawant: नुकताच राखीनं आदिलसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिल आणि राखी यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी ही ऑफ शोल्डर, थाई हाई स्लिट पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे तर आदिल हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. राखीनं शेअर केलेला हा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



'Bigg Boss 16' मधून Salman Khan ची एक्झिट!

Salman Khan Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा कार्यक्रम बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) नावाने ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून भाईजान हिंदी 'बिग बॉस'च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सलमान सध्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता त्याने या कार्यक्रमातून निरोप घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. 



Urfi Javed: सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन, मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस; चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई (Mumbai) पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Farzi Trailer Out: शाहिद अन् विजय सेतूपतीच्या 'फर्जी'चा ट्रेलर रिलीज; या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Farzi Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि साऊथमधील स्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हे 'फर्जी' (Farzi) या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या  ओटीटी प्लॅटफॉर्म  प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी (13 जानेवारी) 'फर्जी'चा ट्रेलरही रिलीज झाला, या ट्रेलरमधील शाहिदच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले. या सीरिजमध्ये शाहिद एका नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.


Kiran Mane: 'चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरण माने हे मराठी बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला. बिग बॉसच्या घरामध्ये असताना किरण माने यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यावर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदची अद्याप लेखी तक्रार नाही : सूत्रांची माहिती


Urfi Javed : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण उर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे. 


उर्फी जावेदने आज महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकरणकर यांची भेट घेतली. यावेली तिने घातलेल्या टीशर्टवर लिहिलेले इंग्रजी वाक्य विशेष चर्चेत होतं. Not A Nepo baby (आपण कोणत्याही सेलिब्रिटीचं मुल नव्हे) अशा आशयाचं वाक्य टीशर्टवर लिहिण्यात आलं असल्याचं पाहायला मिळालं. आपल्याला कोणताही वारसा नसताना देखील आपण स्वतःच्या पायावर उभे असून आपण आपली लढाई देखील स्वतःच लढत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उर्फी जावेदने यानिमित्ताने दिला असल्याचं पाहायला मिळालं.


Joshi Abhyankar Serial Murders : ज्या संक्रांतीला पुण्यावर खऱ्यारितीने संक्रांत आली...


Joshi Abhyankar Serial Murders : जोशी अभ्यंकर हत्याकांडाला (Joshi Abhyankar Serial Murders) 14 जानेवारीला सुमारे 47 वर्ष पूर्ण होतील. याच अनुषंगाने जनसंपर्क व सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सीमा खंडागळे यांनी पुणे किलिंग्स जक्कल केस (Pune Killings: Jakkal Case) या नावाने या घटनेबद्दल मराठीमध्ये (Marathi) पॉडकास्ट सादर केला आहे.  या पॉडकास्टचे कथन हे  सिद्धार्थ नाईक याने केले आहे. तर या पॉडकास्टचा पहिला भाग अमेझॉन म्युझिकवर उपलब्ध झाला आहे.


Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेंच्या 'घर, बंदूक, बिरयानी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक  नागराज मंजुळे (Nagraj Manjule)  हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी' हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 


  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.