Entertainment News Live Updates 13 February : नय्यो लगदा गाण्यामुळे सलमान खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता
Bigg Boss-16: बिग बॉस-16 (Bigg Boss-16) च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 चा विजेता ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
'किसी का भाई किसी की जान' मधील पहिलं गाणं रिलीज
हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) या गाण्याचा टीझर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सलमानचे चाहते उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत होते. आता हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
Gautami Patil Apology : 'मी आता सुधारले तरी जुने व्हिडीओ लावून का बदनाम करता?', गौतमी पाटीलने पुन्हा मागितली माफी
Gautami Patil Apology : 'मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली. आता ती चूक मी परत करणार नाही. आतातरी मला माफ करा, अशी विनंती लावणी क्वीन गौतमी पाटीलने (Gautami Patil) केली आहे. आज मोडलिंब येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ती असं म्हणाली आहे.
Masuta: सामाजिक संदेश देणारा 'मसुटा' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित 'मसुटा' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा 'मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.
केजीएफ मधील यश आणि कांतारा फेम ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 12 फेब्रुवारी रोजी 'एरो इंडिया 2023' चे उद्घाटन करण्यासाठी बेंगळुरू (Bengaluru) येथे गेले होते. यावेळी राजभवनात त्यांनी साऊथ चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची भेट घेतली. ‘केजीएफ’ (KGF) फेम यश (Yash) आणि 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांची भेट नरेंद्र मोदी यांनी घेतली. ऋषभ शेट्टी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Inspiring meeting PM @narendramodi ಅವರು as we discussed role of Entertainment industry in shaping New India and Progressive Karnataka. Proud to contribute towards #BuildingABetterIndia 🇮🇳 Your visionary leadership inspires us & your encouragement means the world to us @PMOIndia pic.twitter.com/M95vv2cJk2
— Rishab Shetty (@shetty_rishab) February 13, 2023
Shreyas Talpade: चित्रपटामधील एका सीनमुळे श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनच्या व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं माफी मागितली आहे.
Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही".
Salman Khan: कुणी म्हणतंय, 'पीटी टीचर' तर कुणी म्हणतंय, 'मुर्गी वाली डान्स स्टेप'; 'नय्यो लगदा' गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
Salman Khan Trolled For Naiyo Lagda Song: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं काल (12 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आलं. 'नय्यो लगदा' (Naiyo Lagda) असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 'नय्यो लगदा' गाणं सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या गाण्यामधील सलमानच्या एका डान्स स्टेपला नेटकरी ट्रोल करत आहेत.
Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या पसंतीने अविवाहित नाही".