एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 12 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 12 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

'आपडी-थापडी'चा टीजर लाँच

अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची जोडी दसऱ्याला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे.

महेश मांजरेकरांनी केली 'निरवधी' सिनेमाची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं होतं. पण कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'झिम्मा', 'पावनखिंड', धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता 'निरवधी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिंदास काव्याचे एका दिवसांत वाढले तब्बल 70 हजार सबस्क्राईबर

औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या  शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70 हजार सबस्क्राईबर वाढले.

सलमान खानच्या अडचणीत वाढ

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे.

अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन

दाक्षिणात्य अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.

22:02 PM (IST)  •  12 Sep 2022

Vikram Box Office : कमल हासनचा 'विक्रम' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Vikram Box Office : कमल हासनचा 'विक्रम' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 426 कोटींची कमाई केली आहे. 

21:42 PM (IST)  •  12 Sep 2022

Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन' देणार 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर

Ponniyin Selvan : मीडिया रिपोर्टनुसार, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाचे राईट्स 125 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. त्यामुळेच या सिनेमाने रिलीजआधीच 125 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

20:46 PM (IST)  •  12 Sep 2022

Victoria Marathi Movie : सोनाली कुलकर्णीचा 'व्हिक्टोरिया' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Victoria Marathi Movie : मराठी मनोरंजनविश्वात आता 'व्हिक्टोरिया' (Victoria) सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीत अशोक (Jeet Ashok) आणि 'माझा होशील ना' फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

19:33 PM (IST)  •  12 Sep 2022

Kanni Movie : हृता दुर्गुळेने वाढदिवशी केली 'कन्नी'ची घोषणा

Kanni Movie : मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'मन उडू उडू झालं' या हृताच्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर हृताचे 'अनन्या' आणि 'टाइमपास 3' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'अनन्या' सिनेमाच्या माध्यमातून हृताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता हृताचा लवकरच 'कन्नी' (Kanni) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

18:02 PM (IST)  •  12 Sep 2022

Marathi Serial : आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार दोन नव्या मालिका

Marathi Serial : मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून नव-नवे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नव्या मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. आजपासून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) आणि 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' (Chotya Bayochi Motthi Swapna) या दोन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget