एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 11 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 11 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘रॅप किंग’चा घटस्फोट; 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने घेतला निर्णय

आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय गायक 'यो यो हनी सिंह'चा (Yo Yo Honey Singh) घटस्फोट झाला आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनीसोबत घटस्फोट घेतला आहे. 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता. हनीने शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप त्याची पत्नी शालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 2011 साली हनी सिंह शालिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता. 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांची लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आता लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.

'ब्रम्हास्त्र'ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता या सिनेमाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा एचडी क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. अनेक साईटवरून हा सिनेमा नेटकरी डाऊनलोड करत आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘केवळ दांडी यात्रेने स्वातंत्र्य नाही मिळालं...’, ‘कर्तव्यपथा’च्या उद्घाटनाला कंगनाचं वक्तव्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथा’चे (Kartavyapath) उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात देशातील अनेक नेते, कलाकार आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतही (Kangana Ranaut) सामील झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी कंगनाने अनेक वक्तव्ये केली.

23:19 PM (IST)  •  11 Sep 2022

Me Ani Dr Kashinath Ghanekar : रमेश भिडेंच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Me Ani Dr Kashinath Ghanekar : 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Ani Dr Kashinath Ghanekar) हा सिनेमा गेल्या काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. अशातच रमेश भिडे (Ramesh Bhide) लिखीत 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Me Ani Dr Kashinath Ghanekar) हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दादरच्या रविंद्र नाट्यमंदिरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. 

23:16 PM (IST)  •  11 Sep 2022

कार्तिक आर्यन-सारा अली खान पुन्हा एकत्र?

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत होती. परंतु त्यांच्या ब्रेकअपने त्यांचे चाहते नाराज झाले होते. या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र ब्रेकअपनंतर या दोघांची काही वक्तव्ये चर्चेत आली होती.त्यानंतर ते दोघे कधीच एकत्र दिसून आले नव्हते. मात्र अलीकडे त्यांच्यातील वाद मिटलेला दिसून येत आहे. नुकतंच सारा आणि कार्तिक एकत्र दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

19:37 PM (IST)  •  11 Sep 2022

Bigg Boss 16 Date : या दिवशी सुरू होणार भाईजानचा बिग बॉस

Bigg Boss 16 Date : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस' (Bigg Boss) या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानच्या बिग बॉसचे 15 पर्व चांगलेच गाजले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसचे चाहते 16 व्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे. 

18:36 PM (IST)  •  11 Sep 2022

Salman Khan : सलमान खान सुरक्षेत वाढ

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. 

17:22 PM (IST)  •  11 Sep 2022

Bindas Kavya : बिंदास काव्याचे एका दिवसांत वाढले तब्बल 70 सबस्क्राईबर

Bindas Kavya : औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70  सबस्क्राईबर वाढले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget