Entertainment News Live Updates 11 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या हातात कोट्यवधींचं घड्याळ
'पठाण' चित्रपटातून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने चांगलंच कमबॅक केलंय. आज सोळाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर पठाणची जादू कायम आहे. पठाणने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे शाहरूख खान सध्या चर्चेत आहे. परंतु आता तो त्याच्या हातातील घड्याळामुळे देखील चर्चेत आलाय. शाहरुखच्या घड्याळाने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु शाहरूखच्या घड्याळाची किंमत ऐकून अनेक जण थक्क होत आहेत. या घड्याळ्याची किंमत 4.98 कोटी रुपये आहे. शाहरुखच्या घड्याळाची किंमत डाइट सब्याच्या अधिकृत इनस्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.
Pathaan Box Office Day 16 : बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची कमाई सुरूच
Pathaan Box Office Day 16 : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 16 दिवस झाले. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पठाण हा चित्रपट जगभरात कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. नुकतीच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाने दोन आठवड्यात तब्बल 888 कोटींचा आकडा पार केला आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या नावामागचं रहस्य उलगडणार
Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण मालिकेत नेत्राला सातव्या मुलीची सातवी मुलगी असं का म्हटलं जातं आणि या नावामागचं रहस्य काय आहे हे प्रेक्षकांना येत्या रविवारी म्हणजेच 12 फेब्रुवारीला दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आतापर्यंत ममताच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, त्रिनयना देवीच्या मंदिरातील रहस्य असलेला ग्रंथ कोणी चोरला आणि राजाध्यक्ष कुटुंबातील जीवघेण्या कारस्थानामध्ये कोणाचा हात आहे, या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत.
Bigg Boss 16 Winner : प्रियांका चौधरी आणि एमसी स्टॅन 'बिग बॉस'च्या विजेतेपदापासूनच दूरच!
Bigg Boss 16 Winner : 'बिग बॉस' हिंदीचे 15 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले असले तरी 16 वं पर्व मात्र वेगळं ठरलं आहे. 16 वं वरीस धोक्याचं असल्याप्रमाणे 'बिग बॉस'चं 16 वं पर्वदेखील स्पर्धकांसाठी धोक्याचं ठरू शकतं. 'बिग बॉस' घरातील प्रत्येक कामात तसेच सदस्यांना गरज असेल तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे एक चांगला खेळाडू म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे खेळ कसा बदलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
Urfi Javed : 'व्हॅलेंटाईन डे'ला गायीला मिठी मारा या केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेदने खास ट्वीट
Urfi Javed Tweet On Cow Hug : सध्या व्हॅलेंटाईन वीकचा माहोल आहे. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेटाईन डे' (Valentine Day) बरोबरच 'काऊ हग डे'देखील (Cow Hug Day) साजरा केला जातो. दरम्यान केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने 'व्हॅलेंटाईन डे'ला गायीला मिठी मारण्याचा सल्ला दिला होता. आता यावर आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) ट्वीट केलं आहे.
#CowHugging
— Uorfi (@uorfi_) February 9, 2023
Cow ki bhi consent hona zaroori hai boss pic.twitter.com/ZdHMyw0OfO
Kiara Advani : कियारा आडवाणीच्या संगीतात भाऊ मिशालने गायलेलं 'हे' गाणं
Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra) नुकतेच राजस्थानमधील सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासह प्री-वेडिंग फंक्शननेदेखील चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. नवविवाहित जोडप्याने अद्याप त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक चाहत्यांना दाखवली नसली तरी कियाराचा भाऊ मिशाल आडवाणीने त्यांच्या संगीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिशाल आपल्या बहिणीच्या संगीतात गाणं गाताना दिसत आहे.
View this post on Instagram
Paach Futacha Bacchan : 'पाच फुटाचा बच्चन'च्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद
Paach Futacha Bacchan Marathi Natak : गेल्या काही दिवसांपासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटकं येत आहेत. अशातच आता 'पाच फुटाचा बच्चन' (Paach Futacha Bacchan) हे मारीठी नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच प्रयोगाने नाट्यरसिकांना भुरळ घातली आहे.
Rakhi Sawant : राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा होणार पूर्वाश्रमीच्या पतीची एन्ट्री
Ex Husband Ritesh On Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' तसेच 'बिग बॉस'ची बायको म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) राखीची फसवणूक केल्याने ती प्रचंड दुखावली गेली आहे. तिने आदिलवर मारहाण, फसवणूक तसेच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
View this post on Instagram