एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Happy Birthday Hrithik Roshan : पहिलाच सिनेमा सुपरहिट! वर्षात 100 पेक्षा जास्त पुरस्कार, जाणून घ्या हृतिक रोशनचा प्रवास...

Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. हृतिकचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

पहिलाच सिनेमा सुपरहिट!

हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. एकीकडे सिनेमाला यश मिळत असताना दुसरीकडे मात्र हृतिकला अश्रू अनावर झाले होते. सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर हृतिक त्याच्या रुममध्ये पाच दिवस रडत बसला होता. त्यावेळी त्याला आपण सिनेसृष्टीत पदार्पण करुन चूक केली असं त्याला वाटत होतं. 

"माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर"; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खानला थेट इशारा

Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच... त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूड गाजवलं होतं. सध्या सोमी अली चर्चेत अली आहे ती तिनं पुन्हा एकदा सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे. 

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)

आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".

15:21 PM (IST)  •  10 Jan 2023

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' गाणं होतंय ट्रेंड; मिळाले एवढे व्ह्यूज आणि लाइक्स

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांचे 'मूड बना लिया' (Mood Banaleya) हे गाणे चार दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

14:51 PM (IST)  •  10 Jan 2023

Pathaan Trailer: 'हा रणवीर सिंह आहे?'; पठाणचा ट्रेलर रिलीज होताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Pathaan Trailer: बॉलिवूडमधील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) अॅक्शननं तसेच दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण हा ट्रेलर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक दिसत आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. 

13:53 PM (IST)  •  10 Jan 2023

Urfi Javed: उर्फीनं चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; ट्वीट शेअर करत म्हणाली, "चित्रा अशी कशी गं तू..."

Urfi Javed: अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात  सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली. सध्या उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

11:35 AM (IST)  •  10 Jan 2023

Pathaan Trailer OUT: शाहरुखच्या पठाणचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अॅक्शन अन् डायलॉग्स, दीपिकाच्या लूक्सवरुन नजर हटणार नाही

Pathaan Trailer OUT: 'बॉलिवूडचा बादशाह' अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) आणि बेशरम रंग (Besharam Rang) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. या गाण्यांनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर (Pathaan Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. या चित्रपटात शाहरुख खान दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

14:08 PM (IST)  •  10 Jan 2023

Bigg Boss 16: 'आईला तुझा अभिमान वाटतोय'; भावाला पाहून ढसाढसा रडली फराह खान; नेटकरी म्हणाले, 'त्यानं केलंय काय?'

Bigg Boss 16बिग बॉस-16 (Bigg Boss 16) च्या चाहत्यांसाठी यंदाचा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात बिग बॉस-16 मधील स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्य बिग बॉसच्या घरात येणार आहेत. शिव ठाकरेची (Shiv Thakare) आई, एम. सी. स्टॅनची आई आणि  साजिद खानची (Sajid Khan) बहीण फराह खान (Farah Khan) हे बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत. बिग बॉस-16 चा एक प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान ही साजिदला पाहून रडताना दिसत आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget