एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'किसी का भाई किसी का जान' सिनेमातील 'यंतम्मा' गाण्यावर टीका

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. दबंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण रिलीजआधीच या सिनेमातील 'यंतम्मा' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दक्षिण भारतीयांनी या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार

Tejaswini Lonari Upcoming Movie : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व गाजवणारी तसेच 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणाऱ्या तेजस्विनीचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तेजस्विनीच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. पण या सिनेमात ती मराठमोळे अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Anaspure) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यका विरोधात पोलिसांत तक्रार

Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station Andheri) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तसेच सय्यद यांची दुबई, लंडनमध्ये मालमत्ता आहे, असा आरोप शिंदे यांनी केला होता. सय्यद यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. आता याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

18:54 PM (IST)  •  10 Apr 2023

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer: 'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं'; सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' जबरदस्त ट्रेलर रिलीज

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer:  बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला  'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं' हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

18:09 PM (IST)  •  10 Apr 2023

Nawazuddin Siddiqui: नवाझऊद्दीन सिद्दीकी कौटुंबिक वाद प्रकरणी सुनावणी; नवाझच्या मुलांना लवकरच शिक्षणासाठी पुन्हा दुबईला पाठवलं जाईल

Nawazuddin Siddiqui:  बॉलिवूड अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादाचं प्रकरणी नवाझ आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात काही सामंज्याचे मुद्दे मान्य केले गेले होते. यावर आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या चेंबरमधील  सुनावणीत चर्चा झाली. ज्यात नवाझच्या मुलांना लवकरच शिक्षणासाठी पुन्हा दुबईला पाठवलं जाईल. आलियाही त्यांच्यासोबत दुबईत मुलांसोबत जाणार आहे. शूटिंग आटोपल्यावर नवाझही दुबईला मुलांकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आलिया मुलांसह दालनात सुनावणीसाठी हजर होती. 

17:30 PM (IST)  •  10 Apr 2023

Anil Kapoor Workout Video: अनिल कपूर यांचा 66 व्या वर्षी तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस; मायनस 110 डिग्री तापमानात केला वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल

Anil Kapoor Workout Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहेत.  66 वर्षाचे अनिस कपूर हे त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. अनिल हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ  व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वर्कआऊट करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

17:30 PM (IST)  •  10 Apr 2023

Kushal Badrike: कुशल बद्रिके पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; साकारणार ‘रावरंभा’ चित्रपटातील 'कुरबतखान' ही भूमिका

Kushal Badrike:  आपल्या कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या 12 मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’  ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by कलाकृती मीडिया (@kalakrutimedia)

16:35 PM (IST)  •  10 Apr 2023

Man Dhaga Dhaga Jodte Nava : माऊचं कमबॅक! 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत साकारणार आनंदीची भूमिका; प्रोमो आऊट

Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रसारित होत आहेत. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकाचा प्रोमो आऊट झाला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget