Entertainment News Live Updates 03 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 May 2023 06:29 PM
Alia Bhatt Get Mistaken For Aishwarya Rai: मेट गाला इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सचं झालं कन्फ्यूजन; आलियाला म्हणाले 'ऐश्वर्या'; व्हिडीओ होतोय व्हायरल

Met Gala 2023: मेट गाला 2023 (Met Gala 2023) हा इव्हेंट काही दिवसांपूर्वी पार पडला. या इव्हेंटमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या बॉलिवूड अभिनेत्रींनी मेट गाला या इव्हेंटसाठी खास लूक केला होता. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आलिया भट्टनं प्रथमच मेट गाला या इव्हेंटला हजेरी लावली होती. मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील आलियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला. पण आलिया ही सध्या  या मेट गाला इव्हेंटमधील लूकमुळे नाही तर या इव्हेंटमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. 



Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल, तर आता मागे नाही राहायचं! 'कोण होणार करोडपती' होणार सुरू

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या सहभाग प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक मिस्डकॉल द्या आणि एक कोटी रुपये जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला होता. 


वाचा सविस्तर

OTT Release This Week : 'तू झूठी मैं मक्कार' ते 'विक्रम वेधा'; 'या' प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

OTT Release This Week : मे (May) महिन्याचा पहिला आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) या सिनेमासह 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) पर्यंत या सिनेमाचा समावेश आहे. 


वाचा सविस्तर

The Kerala Story : '32000 नव्हे फक्त तीन महिलांची गोष्ट"; 'द केरळ स्टोरी'च्या वादावरुन निर्मात्यांनी केला बदल

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. तर दुसरीकडे या सिनेमाचं कथानक खोटं असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाच्या कथानकावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केरळ सरकारदेखील या सिनेमाला विरोध करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाच्या कथानकात मोठा बदल करण्यचा निर्णय घेतला आहे. 


वाचा सविस्तर

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला

Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत या मराठी सिनेमाने 3.33 कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (Maharashtra Day 2023) या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


वाचा सविस्तर

Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणारा ताब्यात

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या सहा महिन्यांपासून 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. राज्यभरात तिच्या 'त्या' व्हिडीओची चर्चा झाली. कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीने पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी पुणे पोलिसांना (Pune Police) मोठं यश आलं आहे. गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणारा ताब्यात; पुणे पोलिसांना मोठं यश

Salman Khan: सलमाननं पोस्ट शेअर करत एका महिलेला वाहिली श्रद्धांजली, 'ही कोण?', नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न

 Salman Khan Condolence To Addu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह असतो. सलमान हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. सध्या सलमान हा त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. सलमाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  एका महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. सलमानने ज्या महिलेला श्रद्धांजली वाहिली, ती कोण आहे? असा प्रश्न सध्या नेटकरी सलमानला विचारत आहेत.



Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर अरुंधती देणार प्रेमाची कबुली

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका पुन्हा एकदा रोमॅंटिक वळणावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत ईशाच्या सारखपुड्याचं नाट्य सुरू आहे. तर दुसरीकडे संजनाच्या वागणुकीमुळे मालिका थोडी रटाळ होऊ लागली आहे. पण आता मालिकेत पुन्हा एकदा रंजक वळण येणार आहे. 


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर अरुंधती देणार प्रेमाची कबुली; ते तीन शब्द ऐकल्यानंतर आशुतोषचा चेहरा खुलणार

Chatrapathi : प्रभासच्या 'छत्रपती'चा ट्रेलर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्यूज

Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer out : दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) 'छत्रपती' (Chatrapathi) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 





Tu Jhoothi Main Makkaar : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर रिलीज

Tu Jhoothi Main Makkaar OTT Release : 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. 8 मार्च 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना "ब्राह्मण भूषण" पुरस्कार जाहीर


Brahman Bhushan Puraskar: आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने ब्राह्मण भूषण पुरस्काराचे (Brahman Bhushan Puraskar) आयोजन दरवर्षी केले जाते. यंदा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांचे  मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली.


Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' मालिका घेणार प्रेक्षकांना निरोप


Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेची जागा अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम घेणार आहे. 


Ashok Rane : सिनेमाचे मास्तर! चित्रपट-समीक्षक अशोक राणे यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' जाहीर


Satyajit Ray Memorical Awards Winner Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील लेखनासाठी तसेच चित्रपट समीक्षा लेखन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.