Entertainment News Live Updates 02 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Apr 2023 04:44 PM
Circuitt : आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा "सर्किट" हा पहिलाच मराठी सिनेमा

Circuitt Marathi Movie : आयपीएलचा (IPL 2023) फिवर सुरू झाला आहे. तर दुसरीकडे 'सर्किट' (Circuitt) या सिनेमाची जोरदार हवा आहे. आयपीएल आणि टीम 'सर्किट' एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष. 

Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.


Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'रंग माझा वेगळा' पडली मागे

Badshah Wedding : रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

Badshah Wedding Update : लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) सध्या चर्चेत आहे. रॅपर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत (Isha Rikhi) बादशाह लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.





Parineeti Chopra and Raghav Chadha : अफेअरच्या चर्चेदरम्यान आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबई विमानतळावर दिसले एकत्र; पाहा व्हिडीओ...

Parineeti Chopra and Raghav Chadha : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अनेक वेळा सेलिब्रिटींच्या डेटिंगबाबत सोशल मीडिया चर्चा होत असतात. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री   परिणीती चोप्रा  (Parineeti Chopra) आणि आदमी पार्टीचे खासदार   राघव चढ्ढा  (Raghav Chadha) यांच्या नात्याबाबत चर्चा  सोशल मीडियावर होत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला. आता पुन्हा परिणीती आणि राघव चड्ढा हे एकत्र दिसले आहेत. राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघे मुंबई विमानतळावर  (Mumbai  Airport) स्पॉट झाले.



Happy Birthday Kapil Sharma : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

Kapil Sharma Birthday Special : 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्माचा (Kapil Sharma) आज वाढदिवस आहे. मेहनतीच्या जोरावर कपिलने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या कपिलकडे आज नाव, फेम आणि पैसा असं सर्वकाही आहे. विनोदवीर आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 





Masterchef India 7 : 'ठेचा क्वीन' ते 'मास्टर शेफ'; महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल तिसऱ्या क्रमांकावर

Masterchef India 7 Suvarna Bagul : 'मास्टरशेफ इंडिया 7' (Masterchef India 7) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) विजेता ठरला आहे. तर महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल (Suvarna Bagul) यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. 



Shloka Mehta Pregnant : मुकेश अंबानींच्या घरी पुन्हा पाळणा हलणार

Shloka Mehta Pregnancy : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे. मुकेश आणि नीता (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता (Shloka Mehta) लवकरच आई-बाबा होणार आहेत.





Nehha Pendse: नेहा पेंडसेनं शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दारु जास्त झाली...'

Nehha Pendse: मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी मालिकेमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर (Social media) अॅक्टिव्ह असते. नेहा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काल (1 एप्रिल) नेहानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काही प्लेट्स तोडताना दिसत आहे. नेहानं शेअर केलेल्या या व्हिडीओला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.



Dasara: टाळ्या, शिट्ट्या आणि डान्स; नानीच्या 'दसरा' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Nani Dasara: सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना (South Movies) प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अॅक्शन सिन्स, डायलॉग्स आणि गाणी या सर्व गोष्टींमुळे साऊथ चित्रपट हिट ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच दसरा चित्रपटाच्या थिएटरमधील शोदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक हे दसरा चित्रपट बघताना टाळ्या आणि शिट्ट्या वाजवाताना दिसत आहेत.



Amol Kolhe: अमृता खानविलकर अमोल कोल्हेंसोबत लग्नगाठ बांधणार? एका बातमीनं खळबळ, खासदार अमोल कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

Amol Kolhe: खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. काल (1 एप्रिल) अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Sarja Marathi Movie : 'सर्जा' (Sarja) या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. 'जीव तुझा झाला माझा', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या' ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झाला आहे. 


'सर्जा' सिनेमाची झलक दाखवणाऱ्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाचा ट्रेलर चर्चेत आहे. 'सर्जा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा धनंजय खंडाळे यांनी सांभाळली आहे. या सिनेमातील नायक-नायिकेच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री रसिकांना आकर्षित करणारी ठरणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रोहित चव्हान आणि ऐश्वर्या भालेराव ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Box Office Collection : बॉलिवूडला पुन्हा साऊथने दिली टक्कर; नानीच्या 'Dasara' पुढे अजयचा 'भोला' पडला मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...


Bholaa Dasara Box Office Collection : गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'भोला' (Bholaa) हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा 'दसरा' (Dasara) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 


अजय देवगन गेल्या काही दिवसांपासून 'भोला' या सिनेमाचं प्रमोशन करत होता. शाहरुखच्या 'पठाण'नंतर प्रदर्शित झालेला अजयचा 'भोला' हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने चांगलीच कमाई केली. त्यामुळे 'भोला'देखील बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली गेली. पण रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा कमाईच्या बाबतीत मागे पडला. 'भोला' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.20 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने फक्त 7.80 कोटींची कमाई केली. त्यामुळे रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 18.60 कोटींची कमाई केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.