Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 01 Jun 2023 05:58 PM
Yaar Julahe: 'यार जुलाहे' मध्ये पाकिस्तानी कलाकार करणार गुलजार, मंटो आणि चुगताई यांच्या कथांचे वाचन
Yaar Julahe: गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी यांच्या कथांचे वाचन पाकिस्तानी कलाकार करणार आहेत. Read More
Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे (Raj Thackeray) हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.   Read More
Anupamaa Upcoming Twist: अनुपमा मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; काव्यानं गुडन्यूज दिल्यानंतर वनराज कशी देणार रिअॅक्शन?
अनुपमा या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये अनुज आणि अनुपमा यांच्या  नात्यात आणखी कोणते ट्वीस्ट आणि टर्न्स येतात? हे पाहणे रंजक ठरणार आहे.  Read More
Mani Ratnam: मणिरत्नम यांचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग
मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.  मणिरत्नम यांच्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात... Read More
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळानं स्वराजला लावणी शिकवली; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल
'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही स्वराजला लावणी शिकवताना दिसत आहे.  Read More
Ranchi: "धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला, 'द केरळ स्टोरी' पाहिल्यानंतर तक्रार करण्याचं धैर्य मिळालं"; मॉडेलचे रांचीतील व्यक्तीवर गंभीर आरोप
एका मॉडेलनं रांची (Ranchi) येथील एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. Read More
Al Pacino: वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणाऱ्या अभिनेत्याची 29 वर्षाची गर्लफ्रेंड कोण आहे? जाणून घ्या नूर अलफल्लाहबाबत...
Al Pacino Fourth Time Father At 83 Age: द गॉडफादर फेम अभिनेता अल पचीनोची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहबाबत जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ च्या महाअंतिम सोहळ्यात दीपा आणि गौरी करणार जबरदस्त परफॉर्मन्स; पाहा प्रोमो



Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या छोट्या पडद्यावरील डान्स शोचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या शोमध्ये विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा आणि  सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिकेतील गौरी या स्पेशल परफॉर्मन्स करणार आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Saorabh Choughule: “जीव माझा गुंतला” मालिकेतील अभिनेत्यानं आईला दिलं सरप्राइज; 'ताज हॉटेल' मध्ये साजरा केला वाढदिवस, शेअर केला खास व्हिडीओ



Saorabh Choughule: अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh chaugule)  हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. “जीव माझा गुंतला” (Jeev Majha Guntala) या मालिकेमुळे सौरभला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सौरभ हा मल्हारची भूमिका साकारतो. सौरभनं नुकतच त्याच्या आईला खास सरप्राइज दिलं आहे. सौरभनं त्याच्या आईचा


World No Tobacco Day: सलमान खान ते हृतिक रोशन; 'या' कलाकारांनी सोडली सिगारेट



World No Tobacco Day:  31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन  (World No-Tobacco Day) आहे. तंबाखूचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काही बॉलीवूड स्टार्स असे आहेत ज्यांनी स्वत:च्या आरोग्याचा विचार करुन धूम्रपान सोडले आहे. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ता जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल, ज्यांनी सिगारेट सोडली आहे. 


Kareena Kapoor: सेल्फी काढायला आलेल्या फॅनला करीनानं केलं इग्नोर; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'उद्धट..'



Kareena Kapoor Khan Ignored Fan: आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढायची इच्छा अनेकांना असते. कलाकरांसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अनेकदा गर्दी करतात. नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी करीनासोबत सेल्फी काढायला एक चाहती तिच्या जवळ आली पण करीनानं तिच्या त्या फॅनला इग्नोर केलं. करीना आणि तिच्या या फॅनचा व्हिडीओ  एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.