Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 20 Aug 2023 05:30 PM
Sharmishtha Raut: शर्मिष्ठासाठी तेजस गिरगाव सोडून ठाण्याला झाला शिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

Sharmishtha Raut: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शर्मिष्ठाची ‘सारं काही तिच्यासाठी’  (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या मालिकेत दोन बहिणींचे नाते दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी आदेश बांदेकर यांनी या कलाकारांनी विविध प्रश्न विचारले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte:'खरंतर मी एक ऑड मॅन आऊट होतो...'; ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेनं  1000 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्तानं या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.



Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update) यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.




Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update) यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.


Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात

Sunny Deol: 'मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. योग्य वेळ आल्यावर...'; सनी देओलच्या पोस्टची चर्चा

Sunny Deol:  अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'गदर 2' चित्रपटामधील  सनी देओलच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत . आता 'गदर 2' चित्रपटानंतर सनी देओल हा 'बॉर्डर 2' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चर्चा दरम्यान सनी देओलनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Mangesh Desai: 'कुटुंबातील सदस्यांचे आडनाव देशपांडे पण माझं देसाई कारण...'; मंगेश देसाई यांनी सांगितला किस्सा

Mangesh Desai: अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनेक चित्रपटांमध्ये मंगेश यांनी काम केले आहे. मंगेश देसाई यांनी निर्मिती केलेला धर्मवीर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मंगेश यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar ) यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मंगेश यांनी त्यांच्या आडनावाबद्दल सांगितलं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आज या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.





Sunny Deol : सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी; अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचाही होणार लिलाव; नेमकं प्रकरण काय?

Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या चर्चेत आहे. अॅक्शन हिरोचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे 100 हून अधिक बॉलिवूड सिनेमांत काम करणाऱ्या सनी देओलला आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात (Pakistan) बंदी आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याच्या मुंबईतील (Mumbai) बंगल्याचाही लिलाव होणार आहे. 'गदर 2'ने कोट्यवधींची कमाई केल्यानंतरही अभिनेता कर्जाची परतफेड करू शकलेला नाही. 


Sunny Deol : सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी; अभिनेत्याच्या मुंबईतील बंगल्याचाही होणार लिलाव; नेमकं प्रकरण काय?

Kaun Banega Crorepati 15: 'या' प्रश्नामुळे हुकली राहुल नेमा यांची 'करोडपती' होण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

aun Banega Crorepati 15 Rahul Nema: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमामध्ये  राहुल नेमा यांनी हजेरी लावली. राहुल नेमा (Rahul Nema) हे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर बसले होते. त्यांनी  50 लाख रुपये जिंकले. पण एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. 



Jitendra Joshi: 'निर्लज्जपणा किंवा बेफिकिरी...'; जितेंद्र जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Jitendra Joshi: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जितेंद्र जोशींच्या कवितांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. जितेंद्र  हा कधी विविध कार्यक्रमांमध्ये तर कधी सोशल मीडियावर कविता सादर करत असतो. नुकतीच जितेंद्रनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं कविता आणि रिल हा विषय मांडला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pooja Sawant : पूजा सावंतच्या 'दगडी 2' सिनेमाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली,"कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायम जिवंत राहील"

Pooja Sawant Daagadi Chawl 2 Movie : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'दगडी चाळ' (Daagadi Chawl) या सिनेमात अभिनेत्रीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर 'कलरफुल' म्हणून ती ओळखली जाऊ लागली. 'दगडी चाळ'नंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गेल्या वर्षी 'दगडी चाळ 2' (Daagadi Chawl 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमाच्या वर्षपुर्तीनिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट लिहिली आहे. 






Pooja Sawant : पूजा सावंतच्या 'दगडी 2' सिनेमाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली,"कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायम जिवंत राहील"

Hema Malini : हेमा मालिनींना पाहिला सावत्र लेकाचा सिनेमा; 'गदर 2' पाहिल्यानंतर म्हणाल्या,"हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा"

Hema Malini Praised Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'गदर' आणि सनी देओलचे चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनीदेखील त्यांच्या सावत्र लेकाचा सिनेमा पाहिला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


Hema Malini : हेमा मालिनींना पाहिला सावत्र लेकाचा सिनेमा; 'गदर 2' पाहिल्यानंतर म्हणाल्या,"हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा"

Box Office Collection : सनीचा 'गदर 2', रजनीकांतचा 'जेलर' अन् अक्षयचा 'OMG 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; अभिषेकच्या 'घूमर'चे आकडे मात्र निराशाजनक

Gadar 2 Jailer OMG 2 Ghoomer Box Office Collection : सिनेप्रेमींना सध्या मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2), थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 


Box Office Collection : सनीचा 'गदर 2', रजनीकांतचा 'जेलर' अन् अक्षयचा 'OMG 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; अभिषेकच्या 'घूमर'चे आकडे मात्र निराशाजनक

Arun Kadam : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम झाले आजोबा; लाडक्या दादूसची लेक सुकन्याने दिला गोंडस बाळाला जन्म

Arun Kadam Daughter News : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम अरुण कदम (Arun Kadam) सध्या चर्चेत आहेत. विनोदवीर अरुण कदम यांच्या घरी तान्हुल्याचे आगमन झाले आहे. लाडका दादूस अर्थात अरुण कदम यांची लेक सुकन्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे दादूसचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 




Arun Kadam : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम झाले आजोबा; लाडक्या दादूसची लेक सुकन्याने दिला गोंडस बाळाला जन्म

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Majha Katta : आर. अश्विनने संयमी खेरला दिले गोलंदाजीचे धडे, माझा कट्ट्यावर अभिनेत्रीने केला खुलासा


Majha Katta : अभिनेत्री संयमी खेर सध्या घूमर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. लहानपणापासून संयमी क्रिकेट खेळत आली आहे. पण चित्रपटासाठी तिला मेहनत घ्यावी लागली. गोलंदाजीचे धडे घेण्यासाठी संयमीने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विनची मदत घेतली होती. संयमीने कट्ट्यावर या अनुभवाबाबत सांगितलेय. अभिनेत्री संयमी खेर आणि निर्माती, दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. घूमर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठमोळ्या संयमी खेर आणि गौरी शिंदे यांनी कट्ट्यावर हजेरी लावली. क्रिकेट खेळाडूच्या अभेद्या इच्छाशक्तीची कहानी घुमर या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. धेयवेडी मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती टोकाचा संघर्ष करु शकते, याचीच गोष्ट या चित्रपटातून अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांच्या माध्यमातून उतरवली आहे. 


Jawan Advance Booking : शाहरुख खानच्या 'जवान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; रिलीजआधीच मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड


Shah Rukh Khan Jawan Movie Advance Booking : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरोनानंतर किंग खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता अभिनेत्याच्या 'जवान' या सिनेमाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. 


Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'


Prajakta Mali New Marathi Movie Teen Adkun Sitaram : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी  सिनेमाचं नाव 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.