Mumbai Crime : राज्यातील संस्थांना मोठा मोठ्या कंपन्यांकडून सीएसआर फंड मिळवून देण्याचे अमिष दाखवत कोट्यवधींची टोपी घालणाऱ्या टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई येथील एका मोठ्या वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील राजकुमार घाडगे यांची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय . यानंतर यातील आरोपी आणि बोरिवली येथील गजानन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष राजनी देशपांडे यांच्यासह 11 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील राजांनी देशपांडे याना तातडीने पोलिसांनी अटक करून मुंबई येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पंढरपूर येथील राजकुमार घाडगे यांची देगाव येथे नर्सरी ते बारावी पर्यंत शिक्षण देणारी सांध्यावली मराठी माध्यमाची खासगी शाळा कार्यान्वित आहे . या संस्थेला इमारतीसाठी कर्ज घ्यायचे होते. मात्र यावेळी आपण कर्जाच्या ऐवजी कंपन्यांचा सीएसआर फंड देतो असे या टोळीने पटवून दिले. यासाठी त्यांनी भारत फोर्ज या कंपनीकडून 30 कोटी रुपये मिळवून देतो. मात्र यातील एक कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतील, असे सांगितले. दरम्यान घाडगे यांनी कोठेही रोख रक्कम न देतो त्यांच्या बँकेत तेवढ्या रकमेची एफडी केली. यानंतर पैसे मिळत नसल्याचे पाहून त्यांनी आपले पैसे परत देण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून तगादा लावला. एफडीची मुदत संपून गेल्यावरही पैसे मिळाले नाहीत.
दरम्यान पुन्हा या टोळीने भारत फोर्ज कडून तुम्हाला पहिला टप्पा म्हणून 84 लाख 35 हजार मंजूर झाले असून काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. हा मेल घाडगे आणि पंढरपूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेलाही आला होता . मात्र पैसे मिळत नसल्याचे पाहून अखेर राजकुमार घाडगे यांनी मुंबई येथील बोरिवली पोलीस ठाण्यात रजनी देशपांडे , सुशीम गायकवाड , जितेंद्र कोकरेज , पोपट मुले , निकम पाटील , अजीज फारुख अब्दुल्ला , जयश्री भोज , अमित मेहता , सुवर्ण ब्रेकर , भारत बाबू रंगारे , आनंद स्वामी आणि अनोळखी चौघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ३१८ ( ४ ), ३१६ ( २), ३ (५), महाराष्ट्र ठेवी संरक्षण ३ व ४ कलमान्वये गुन्हे दाखल केले . यानंतर पोलिसांनी तातडीने गजानन कोऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष रजनी देशपांडे याना अटक केली . यानंतर त्यांना कोर्टात उभे केले असता त्यांना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . याशिवाय पोलिसांनी तातडीने या वित्तीय संस्थेचे कार्यालय देखील सील केले आहे. आता भारत फोर्ज च्या नावाने आलेला मेल खरा आहे का याची तपासणी पोलिसांनी सुरु केली असून या टोळीच्या विरोधात अजून कोणाची फसवणूक झाली आहे का याचाही तपस पोलिसांनी सुरु केला आहे . मात्र राज्यातील संस्थांना टक्केवारी घेऊन सीएसआर फंड मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी आता पोलिसांच्या हाती लागली असून यातून अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं