Entertainment News Live Updates 9 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Jan 2023 06:14 PM
Tunisha Sharma Case : शिझानच्या जामीन अर्जावर आता तारीख पे तारीख

Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी आता शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीन अर्जावर 11 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे. 

Chitra Wagh On Urfi Javed : मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू; उर्फी जावेदच्या नव्या ट्वीटने चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत 'अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू" असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. "मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू", असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवर आक्षेप घेत आहेत. आता मुंबई पोलीस उर्फीवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन 'बिग बॉस' बघायचा अक्षय केळकर

Anuj Thakare On Bigg Boss Marathi Seoson 4 Winner Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay kelkar) खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्याची धमक अक्षयमध्ये आहे. एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत अक्षयचा खास मित्र अनुज ठाकरे (Anuj Thakare) म्हणाला,"अक्षय माझ्यासाठी दागिना आहे". 


Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन 'बिग बॉस' बघायचा अक्षय केळकर; खास मित्र म्हणतोय...

Akshay Kelkar : रिक्षा चालकाचा मुलगा ते 'Bigg Boss Marathi 4'चा विजेता

Akshay Kelkar Bigg Boss Marathi Season 4 Winner : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व नुकतच संपलं असून अक्षय केळकर (Akshay Kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या अक्षयचे पाय आजही जमिनीवरच आहेत. 





Shilpa Shetty : रिचर्ड गिअरसोबतच्या 'त्या' चुंबनाचं प्रकरण, खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका

Shilpa Shetty : तब्बल 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड सूपरस्टार रिचर्ड गिअरसोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या 'किस'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली. साल 2007 च्या घटनेचा तो व्हिडिओ पाहिल्यास शिल्पाचा कोणतंही अश्लिल कृत्य करण्याचा हेतू नव्हता. आयोजित कार्यक्रमाचा उद्देश धर्मादाय आणि एड्सची जनजागृती करण्याचा होता. याच हेतूने रिचर्ड गिअरही तेथे उपस्थित होते. मात्र, नामांकित व्यक्तींचा सहभाग असल्यानं अवास्तव प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही समाजकंटकांनी या घटनेचा चुकीचा अर्थ काढून अश्लिलता आणि असभ्यता पसरविल्याचा आरोप आपल्यावर केल्याचा युक्तिवाद शिल्पाच्यावतीनं अँड. मधुकर दळवी यांनी हायकोर्टात केला. त्याची दखल घेत हायकोर्टानं सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत

Ved : बॉक्स ऑफिसवर आपल्या भावाची हवा; रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ने मोडला नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा रेकॉर्ड

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड सुरू आहे. या सिनेमाने आता नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित 'सैराट' (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 





Amruta Fadnavis : "मूड बना लिया" म्हणत अमृता फडणवीस थिकरल्या

Amruta Fadnavis On Aaj Main Mood Bana Liya Ay Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Main Mood Bana Liya Ay) या गाण्यामुळे चर्चेत आहे. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.





Tunisha Sharma Case: "तुनिषाला वाचवता आलं असतं, पण..."; तुनिषाची आई वनिता शर्मा यांचा शीझान खानवर गंभीर आरोप

Tunisha Sharma Case: काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) मालिकेच्या शुटिंग सेटवरच आत्महत्या केली आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरलं. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा मित्र शीझान खानला (Sheezan Khan) अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. अशातच तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी आरोपी शीझान खानवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. अशातच त्यांना आता शीझानवर एक नवा आरोप केला आहे. तसेच, तुनिषाची हत्याच आहे, असा आरोपही यावेळी बोलताना पुन्हा एकदा तुनिषाच्या आईनं केला आहे.

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार फरहान अख्तर

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार असणाऱ्या फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) आज वाढदिवस आहे. विविधांगी ओळख असेलेल्या फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुबंईतील एका इराणी-मुस्लिम कुटुंबात झाला.


Happy Birthday Farhan Akhtar : लग्नाच्या 17 वर्षांनी घेतला घटस्फोट अन् शिबानी दांडेकर सोबत अडकला लग्नबंधनात; जाणून घ्या फरहान अख्तरचा प्रवास...

Akshay Kelkar : 'Bigg Boss Marathi 4'चा विजेता अक्षय केळकर कोण आहे?

Akshay Kelkar : अक्षयने 2013 साली 'बे दुने दहा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'कमला' मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने 'प्रेमसाथी' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'कॉलेज कॅफे' या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. सब टीव्हीच्या 'भाखरवडी' या हिंदी मालिकेतदेखील त्याने काम केलं आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड Akshay Kelkar


Bigg Boss Marathi 4 Winner Apurva Nemlekar  : अक्षय केळकर (Akshay Kelkar) 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाविजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज एक घर, 16 स्पर्धक आणि 100 दिवसांचा प्रवास संपला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. 


उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट


Urfi Javed On Javed Akhtar : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आहे. तिची स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरत असली तरी काही मंडळींनी मात्र तिच्या बोल्डनेसवर निशाणा साधला आहे. अशातच आता तिने जावेद अख्तरांची (Javed Akhtar) भेट घेतली आहे. 


Piccolo : संगीताचा सूर घेऊन 'पिकोलो' प्रेक्षकांच्या भेटीला


Piccolo : मराठी  चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण  विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना  दिसत आहेत.  हीच बाब लक्षात घेत अभिजीत मोहन वारंग  दिग्दर्शित ‘पिकोलो’ (Piccolo) या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होणार? रिटा रिपोर्टरने दिली महत्त्वाची माहिती


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही विनोदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या मालिकेचा टीआरपी घसरल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजाने यासंदर्भात म्हणाली, मला नाही वाटत मालिका बंद होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.