Nauhid Cyrusi Birthday: शेवटपर्यंत चित्रपट अपयशीच ठरले, 'पिया बसंती गर्ल' म्हणून मिळाली देशभरात ओळख
वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडलिंग पासून सुरुवात केलेली नौहीद तिचा 42 वा वाढदिवस यंदा साजरा करतेय.
Nauhid Cyrusi Birthday: बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत आपलं नाव मोठं व्हावं असं प्रत्येक या सृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रीला वाटत असतं. पण कधीही ते यशस्वी होतं तर कधी नाही. एखादा रोल मधून आयुष्य बदलून जातं तर कधी कधी शेवटपर्यंत सहकलाकार म्हणूनच काम करावं लागतं हे मनोरंजन सृष्टीतलं कडवं सत्यच म्हणावं लागेल. पण कधी ना कधी वेळ येते आणि ती व्यक्ती कायमस्वरूपी मनात ठसते. असे प्रसंग हे या इंडस्ट्रीस नवे नाहीत. नौहिद सायरुसी हीच ही असंच झाल्याच दिसतं. वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडलिंग पासून सुरुवात केलेली पिया बसंती गर्ल (Piya Basanti Girl) नौहीद तिचा 42 वा वाढदिवस यंदा साजरा करतेय.
जाहिराती मालिका मग सिनेमे
हेड अँड शोल्डर्स सारख्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये चमकल्यानंतर, धारा होईल ब्रिटानिया हार्ट बिस्किटे करत करत नौहिदला हिंदी मालिका मिळू लागल्या खऱ्या. पण त्याही सहकलाकाराच्या भूमिकेसाठी. अनेक चित्रपटांमध्ये ही असेच एखाद्या छोट्या भूमिकेत दिसलेली नौहीदला अखेर पिया बसंती रे गाण्यासाठी कास्ट केलं गेलं. आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. प्रदीप सरकार दिग्दर्शित आणि शिमल्याजवळील कोठगड येथे चित्रित केलेल्या या व्हिडिओने तिला राष्ट्रीय स्तरावर 'पिया बसंती गर्ल' म्हणून लोकप्रिय केले.
पिया बसंती गर्ल म्हणून मिळाली ओळख
झी टीव्हीवरील हिप हुर्रे या मालिकेत मीराची भूमिका साकारलेली आणि नंतर सोनीच्या जस्ट मोहब्बत मध्ये ही पाहुण्यांच्या भूमिका साकारलेली नौहीद सायरुसी हिच्या कारकिर्दीत 2000 मध्ये टर्निंग पॉईंट आला. उस्ताद सुलतान खान आणि के एस चित्रा यांनी गायलेल्या पिया बसंती गाण्यासाठी म्युझिक व्हिडिओमध्ये नौहिदला कास्ट केले गेले आणि राष्ट्रीय स्तरावर तिला पिया बसंती गर्ल म्हणून ओळख मिळाली.
मोठ्या पडद्यावर अपयशी ठरली पण..
लोकप्रिय म्युझिक व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या या पिया बसंती गर्ल्स नशीब मोठ्या पडद्यावर मात्र तितकेसं चमकले नाही. 2008 ची हॉरर कॉमेडी भूतनाथ फिल्म असो वा विक्रमभट्ट चा इंतेहा हा सिनेमा असो.. अमिताभ बच्चन सुनील शेट्टी सनी देओल सह अनेकांसोबत काम केलेल्या नौहीदचे चित्रपट सलग अपयशी झाले. पण नंतर पिया बसंती गाण्यासह खतरो के खिलाडीमुळे ही तिला घरोघरी ओळखले जाऊ लागले.
हेही वाचा:
Hema Malini Birthday : ही अभिनेत्री वजनामुळे झाली रिजेक्ट, नंतर बनली बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल'