Mallika Sherawat Birthday: मर्डरमधील इंटिमेट सीन्स, वादग्रस्त वक्तव्ये अन् बोल्ड लुकमुळं वारंवार ट्रोल, मल्लिका या काँट्रोवर्सींमुळे आली अडचणीत
हरियाणाच्या हिसार या गावात जन्मलेल्या मल्लिकाचं नाव रीमा लांबा असं आहे. 2003 मध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
![Mallika Sherawat Birthday: मर्डरमधील इंटिमेट सीन्स, वादग्रस्त वक्तव्ये अन् बोल्ड लुकमुळं वारंवार ट्रोल, मल्लिका या काँट्रोवर्सींमुळे आली अडचणीत Entertainment Mallika Sherawat Birthday Murder Intimate scenes controvercial statement and bold look Mallika sherawats this controversy you must know Mallika Sherawat Birthday: मर्डरमधील इंटिमेट सीन्स, वादग्रस्त वक्तव्ये अन् बोल्ड लुकमुळं वारंवार ट्रोल, मल्लिका या काँट्रोवर्सींमुळे आली अडचणीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/23/49abf4cd541b9742cf2fd01dddf4a41a17296726972401063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mallika Sherawat Birthday: अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहणारी आणि आता पुन्हा चित्रपटामधून पुनरागमन करणारी मल्लिका शेरावत कायमच तिच्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाते. 24 ऑक्टोबर रोजी ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. हरियाणाच्या हिसार या गावात जन्मलेल्या मल्लिकाचं नाव रीमा लांबा असं आहे. 2003 मध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच दौरान मर्डर सिनेमातील बोल्ड सीन्स मुळे चर्चेत आलेल्या मल्लिका शेरावतबाबतीत ओढावलेले हे वादग्रस्त प्रसंग तुम्हाला ठाऊक आहेत का?
मर्डरमध्ये इंटिमेट सीन देत बनवली वेगळी ओळख
2004 साली इंडस्ट्रीत आलेल्या मल्लिका शेरावतचा आलेला मर्डर सिनेमा तिच्या करियरसाठी प्रचंड वादग्रस्त ठरल्याचं सांगितलं जातं. अभिनेता इमरान हाश्मीसोबत केलेल्या इंटिमेट सीन्स दिल्यानं सेक्स सिंबॉलचा टॅग देत मल्लिकासोबत डर्टी पॉलिटिक्सचा सामना करावा लागला. या सिनेमानंतर इमरान हाश्मीने तिला सर्वात वाईट किसर म्हणले होते. तेंव्हापासून त्या दोघांमध्ये बरीच भांडणे होती. ती काही दिवसांपूर्वी पुन्हा मिटली आहेत.
कान्स फेस्टिवलमधल्या लूकवरून टीका
मल्लिकानं तिच्यावर कोणत्याही टीकेला न जुमानता बोल्ड अंदाजात सतत लोकांच्या समोर येत गेली आणि कालांतराने तिची ओळख बदलली. कान्स फेस्टिव्हलमध्ये तिने पांढरा ब्लाऊज आणि थाय स्लिट स्कर्ट परिधान केला होता. या बोल्ड ड्रेसमुळे तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
भारताविषयी केलेल्या वक्तव्यांमुळेही झाली ट्रोल
मर्डर चित्रपटातील कॅरेक्टरची तुलना केल्याने, तसेच भारताच्या प्रतिगामी व संकुचितपणावर तिने केलेल्या वक्तव्यामुळेही ती चांगलीच रोषाची धनी झाली.त्यानंतर काही वर्षांनी लॉस एंजलिसमध्ये जाण्याबद्दल विचारले असता तिने एका मुलाखतीत भारत महिलांसाठी प्रतिगामी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळेही ती चांगलीच ट्रोल झाली होती. मिडियाच्या एका वर्गाकडून वारंवार तिच्या शरिरावर आणि ग्लॅमरविषयी बोलले जाते असे म्हणत तिने टीका केली होती. त्यावरही तिच्या वादग्रस्त विधानांवर टीका करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)