Leonardo DiCaprio Birthday: 25 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना डेटही करत नाही 'हा' अभिनेता?, कारण काय तर..
हॉलिवूडचा स्टार लियोनार्डोची लव्ह लाईफ खूपच रंजक आहे. लियोनार्डो हा हॉलिवूडमधील बॅचलरपैकी एक मानला जातो.
Leonardo DiCaprio Birthday: टायटॅनिक फेम लियोनार्डो डिकेप्रियोला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. हॉलिवुडच्या या अभिनेत्याला जगभरातील प्रेक्षकांकडून जेवढं प्रेम मिळतं तेवढंच भारतीय प्रेक्षकांकडूनही मिळतं. हॉलिवूडच्या अनेक उत्कृष्ट कलाकारांपैकी समजल्या जाणाऱ्या कलाकारांपैकी एक असणाऱ्या लियोनार्डोचा आज वाढदिवस आहे. या खास दिवशी त्याच्या आयुष्यात त्यांच्या लव्ह लाइफ बद्दल एक वेगळीच गोष्ट सांगितली जाते.
हॉलिवूडचा स्टार लियोनार्डोची लव्ह लाईफ खूपच रंजक आहे. लियोनार्डो हा हॉलिवूडमधील बॅचलरपैकी एक मानला जातो. जवळपास ३० वर्ष त्याचं नाव कोणत्या न कोणत्या अभिनेत्रीशी जोडलं गेलं. २०२४ मधील लिओनार्डो एका मॉडेलसोबत असल्याची चर्चेत होता. ही मॉडेल त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान आहे. ही एकमेव मॉडेल आहे जिचं वय २६ वर्षांचं आहे. कारण लिओनार्डोनं आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात एकदाही २५ वर्षांच्या पुढच्या मुलीला डेटही केलं नाही!
२०१७ मध्ये अर्ध्या वयाच्या मुलीला केलं डेट
काही वर्षांपूर्वी लिओनार्डो अभिनेत्री कॅमिला मॉरोनला डेट करत होता. या दोघांनी एकत्र सुट्टी घालवल्याचंही दिसलं. लिओनार्डो ४५ वर्षाचा असताना ही अभिनेत्री २० वर्षांची होती. लिओनार्डो डिकॅप्रीओची त्याच्या वयानं लहान असलेली गर्लफ्रेंड असल्याची चर्चा २०२३ मध्ये १९ वर्षीय मॉडेल इडन पोलानीच्या शेजारी बसलेला दिसल्यावर सुरु झाली होती. पण ते ज्या पार्टीत बसले होते, तिथल्या लोकांनी ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं. आणि त्याचे सगळीकडं मीम्स शेअर होऊ लागले. पण डेटींगचा २५ वर्ष वयाचा काही संबंध नसल्याचंच त्याच्या जवळचे लोक सांगतात.
डेटींगच्या जगात लिओनार्डोविषयी अभिनेत्री सांगतात...
द न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डेटींगची चर्चा असलेले बार रेफलीने तिच्यात आणि लिओनार्डोमध्ये मैत्रीचे संबंध कायम राहतील असं सांगितलं.ते दोघे आजही मित्र म्हणून बोलतात. ते वेगळे झाले ते त्यांच्यापैकी कोणीच सेटल होण्यासाठी तयार नव्हते म्हणून..दोघांच्याही करियरची दिशा वेगळी सुरु हेाती. लिओनार्डोला डेट करणाऱ्या अभिनेत्रीनं लिओनार्डो आता या क्षणात जगत असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं. यावरून त्याच्या डेटींगच्या २५ वर्षांचं कारण कळू शकतं. आजही त्यानं डेट केलेल्या अभिनेत्री मॉडल त्याच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचंच सांगतात.