एक्स्प्लोर

Entertainment: क्रिती सेननचा डबलरोल, फसवणूकीचा 'दो पत्ती' थ्रीलरपट पहायला मिळणार 'या' तारखेला, ट्रेलरही झाला लाँच

अनेक माइंडगेम, रोमांस, ड्रामा आणि फसवणूकीमुळे घडलेला सारा प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

Do Patti Trailor: बॉलिवूडमध्ये सध्या काजोल आणि क्रिती सेनन यांच्या स्टारकास्ट असणारा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दो पत्ती असं या सिनेमाचं नाव असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये क्रिती सेनन ही डबलरोलमध्ये दिसत आहे. अनेक माइंडगेम, रोमांस, ड्रामा आणि फसवणूकीमुळे घडलेला सारा प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. क्रितीच्या दुहेरी पात्रामुळे या कथेला नवे वळण मिळते. काजोल हा सगळा प्रकार कसा सोडवते. यात काय काय ट्विस्ट येणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 

दो पत्ती हा थ्रिलर ड्रामा असणारा सिनेमा २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

फसवणूक आणि आसुयेचं जाळं

फसवणूक आणि भोळेपणाभोवती ही कथा विणली गेली आहे. कथा सौम्या आणि ध्रुवच्या प्रेमापासून सुरु होते. अचानक सौम्याच्या जुळ्या बहिणीच्या एन्ट्रीमुळं सौम्याचे आयुष्यच बदलू लागते. बहिणीचा तिरस्कार आणि त्यातून निर्माण झालेल्या इर्षेपोटी सौम्याचा नवरा ध्रूव तिच्या जुळ्या बहिणीकडे आकर्षित होऊ लागतो आणि या कथेला नवे वळण मिळते. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार सख्ख्या बहिणीशी असणारी असूया तिच्या सीमा तिला विसरायला लावते आणि फसवणूकीचा हा थ्रीलरपट पुढे जातो. 

या सिनेमासाठी क्रितीचा उत्साह  मोठा

या सिनेमात काम केल्यानंतर क्रितीनं दो पत्ती माझ्यासाठी खास असल्याचं म्हटलंय. निर्माता म्हणून क्रिती सेननचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं या चित्रपटाची उत्सूकता मोठी असल्याचं तिनं सांगितलं. हा चित्रपट माझ्या बाळासारखा झज्ञला आहे. निर्माती म्हणून माझ्या क्षमतेनुसार आणि नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावर हा चित्रपट अनुभवताना समाधान वाटणार असल्याचं ती म्हणाली.

काजोलच्या नव्या अवताराची मोठी चर्चा

पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणाऱ्या काजोलच्या या नव्या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. अशा भूमिकांसाठी मी नेहमीच उत्सूक असल्याचं काजोल म्हणाली. माझे चाहते मला या नवीन अवतारात कधी पाहतायत हे पाहण्यासाठी मी उत्सूक असल्याचंही तिनं सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget