एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

big boss 18: गुणरत्न सदावर्तेंच्या शेरेबाजीनं उडला हास्यकल्लोळ, कलर्सनं शेअर केला बिगबॉसच्या घरातील मिश्कील अंदाज

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची केस लढवणारे गुणरत्न सदावर्ते थेट बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या

सलमान खान होस्ट असलेला बिग बॉस 18 च्या नवीन पर्वाची सुरुवात झाली असून दोनच दिवसात बिग बॉसच्या घरात स्पर्धक आमने-सामने येत आहेत. दुसऱ्या दिवशीच स्पर्धकांमध्ये वादविवाद होत असताना आता  महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंच्या मिश्किल स्वभावाचं दर्शन झालंय. घरात हास्यविनोद करत शेरेबाजी करणाऱ्या सदावर त्यांचा आगळवेगळे रूप पाहून घरासह प्रेक्षकांमध्येही हशा पिकला आहे. 

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची केस लढवणारे गुणरत्न सदावर्ते थेट बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या खेळाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असून कलर्स टीव्ही आणि बिग बॉस ने शेअर केलेल्या व्हिडिओतून त्यांची खरपूस शेरेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. 

सिरीयस वकील गेला फन मोडमध्ये

सिरीयस वकील अशी ओळख असणारे वकील गुणरत्न सदावर्ते एकदम विनोदी भूमिकेत गेल्याचं पाहून घरातील स्पर्धकही हास्यकल्लोळात सामील झाले होते. बग्गाजी, हेमाजी म्हणत त्यांचा घरातील सहज वावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.  कलर्स टीव्ही आाणि बिगबॉसच्या अधिकृत पेजवरून सदावर्तेंचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या असून सदावर्तेंचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलाय. या व्हिडिओवर फनी व्हिडिओ, ये बंदा सबसे अलग है असं लिहित सदावर्तेंचं कौतूक केलं आहे. यावर कलर्सने जर हसायचं असेल तर सर्वात चांगला इलाज, डॉ गुणरत्न यांची मिश्कील शेरेबाजी हास्याचा बेपर्वा राग असल्याचं लिहिलं आहे.

बिग बॉसच्या टास्कला सुरुवात 

बिग बॉसचे नवनवीन टास्क आता सुरू झाले आहेत. यात ग्रँड प्रीमियर च्या दिवशी बिग बॉस ने चाहत पांडे यांना एक टास्क दिला होता. ज्यामध्ये जर कोणत्याही दोन सदस्यांना त्यांनी जेलमध्ये जाण्यासाठी तयार केलं तर ते जेलमध्ये जाण्यापासून वाचू शकतात असा टास्क होता.  यानंतर तेजिंदर पाल सिंग बग्गा हे स्वतः जेलमध्ये जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी हेमा शर्मालाही जेलमध्ये जाण्यासाठी तयार केले. दरम्यान सदावर्तेंच्या मिश्किल शेरेबाजीने घरातील वातावरण हलकेफुलके झाले होते.

हेही वाचा:

Bigg Boss 18 : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो, बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget