ZEE TVवर लवकरच 'पवित्र रिश्ता' मालिका सुरू; पण मेकर्सवर एकता कपूर का भडकली?
Ekta Kapoor Slams Makers Over Use of Pavitra Rishta Title: पवित्र रिश्ता नावाच्या नव्या शोवरून एकता कपूर नाराज. झी टीव्हीवरील नवीन मालिकेच्या नावावरून वाद.

Ekta Kapoor Slams Makers Over Use of Pavitra Rishta Title: 2009 साली प्रदर्शित झालेली पवित्र रिश्ता ही मालिका अल्पवधीतच घराघरात पोहोचली. या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशात सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत होते. त्यांना या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एकता कपूरच्या कारकिर्दीतील ही मालिका सुपरहिट ठरली होती. दरम्यान, एकता कपूर या मालिकेच्या नावावरून संतापली आहे. झी टिव्ही लवकरच पवित्र रिश्ता नावाचा नवीन शो लाँच करणार असल्याची माहिती आहे. या नव्या शोचं शूटिंग जानेवारी 2026मध्ये सुरू केले जाणार आहे. परंतु, एकता कपूरने या शोच्या नावावरून मेकर्सला झापले आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
एकता कपूरची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
View this post on Instagram
एकता कपूरचा पवित्र रिश्ता ही मालिका 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. अल्पवधीतच ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका बनली. दरम्यान, झी टिव्हीवर पवित्र रिश्ता नावाचा शो तयार होणार आहे. आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपला आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी याला मानसिक दिवाळखोरी म्हटलं आहे. एकता कपूरने 'पवित्र रिश्ता' या नव्या शोच्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. तिनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "तुम्ही जेव्हा स्वत:ची कोणतीही IP तयार करू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या निर्मात्याच्या आधीपासून तयार करत असलेल्या IP (कल्पना सामग्री)वर जगत असता. ही खूप वाईट बाब आहे. किंवा मानसिक दिवाळखोरी आहे. किंवा यापैकी दोन्ही आहे. यात काहीही पवित्र नाही". असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं.
पवित्र रिश्ता नावावरून एकता कपूर भडकल्या
झी टिव्हीवरील सिद्धार्थ वानकारा निर्मित पवित्र रिश्ता या नवीन रोमँटिक शोच्या लाँचिंगपू्र्वी हे निषेध करण्यात आला आहे. या आगामी मालिकेत अबरार काझा आणि प्रियांशी यादव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच पल्लव प्रधान आणि रूपा दिवेटिया देखील या मालिकेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. नाव एकच असले तरी, या नवीन मालिकेचा एकता कपूरच्या मूळ निर्मितीशी आणि मालिकेशी कोणताही संबंध नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या एकता कपूरची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा
























