एक्स्प्लोर

थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा

Mi Savitribai Jyotirao Phule: स्टार प्रवाहच्या "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" मालिकेच्या भव्य दिव्य सेटचे अनावरण. या मालिकेतून मधुराणी गोखले आणि डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार.

Mi Savitribai Jyotirao Phule serial: ..तिच्या पाऊलवाटेवर काटे होते. पण डोळ्यात स्वप्न होती.  तिने पराकोटीचा विरोध सहन केला. पण ज्ञानाचा दिवा कधी विझू दिला नाही.. "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" ही स्टार प्रवाहवरील ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या कार्यक्रमात अभिनेत्री मधुराणी गोखले आणि राजकारणी तसेच अभिनेते अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत आहेत. खऱ्या आयुष्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांनी समाजाला दिशा दाखवली. त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.  दरम्यान, ऐतिहासिक मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या अनावरण सोहळ्याच्या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते  डॉ. अमोल कोल्हे, सावित्रीबाई जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार्‍या मधुराणी  गोखले, स्टार प्रवाहचे व्यवसाय  प्रमुख सतीश राजवाडे तसेच  या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.

या अनावर सोहळ्याने केवळ सेटचा पडदा उघडला नाही तर, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका प्रखर सामाजिक  क्रांतीचा पुनर्जन्म झाला आहे.  स्त्री शिक्षणासाठी, समतेसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी  आयुष्य  वाहून घेतलेल्या सावित्रीबाईंच्या संघर्ष, त्याग आणि धैर्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा सेट त्या काळातील सामाजिक वास्तव, वेदना आणि नव्या आशेचे जिवंत चित्र साकारतो.  प्रत्येक भिंत, प्रत्येक रचना आणि प्रत्येक तपशील त्या काळातील संघर्षकथांना जणू शब्द देतो. दरम्यान, कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण आणि कल्पकतेतून भव्य सेट साकारण्यात आला आहे. 

या ऐतिहासिका मालिकेविषयी कलाकारांच्या भावना

या मालिकेविषयी अभिनेत्री मधुराणी गोखले म्हणाली, "सावित्रीबाई फुले या युगस्त्री होत्या.  खरंतर इतक्या उंच आणि आभाळाएवढं व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.  आज आपण स्वतंत्रपणे शिक्षण घेत आहोत. आपआपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहोत.  प्रगती करत आहोत.  परंतु, दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने या हक्कासाठी प्रचंड संघर्ष केला होता. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणं  माझ्यासाठी खरंच सन्मानाची गोष्ट आहे. या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहे.  मनात या मालिकेविषयी  उत्सुकता, हुरहुर तसेच थोडंपणही आहे.  प्रेक्षकांनी आम्हाला नक्कीच साथ द्यावी. एवढीच अपेक्षा..".

या मालिकेविषयी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, "लार्जर दॅन लाईफ  भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं आहे. माझ्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणं हे एक वेगळंच आव्हान आहे.   बदलाची मशाल उंचावणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे महात्मा जोतीराव फुले त्यांचे थोर विचार आजही  जिवंत आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं माझ्यासाठी खूप खास आहे. 'राजा शिवछत्रपती' या खासा मालिकेनं मला आयुष्यात मोठी ओळख दिली. जवळपास 17 वर्षांनंतर  आज मी स्टार प्रवाहसोबत अभिनेता तसेच निर्माता म्हणून काम करतोय. सावित्रीबाई फुले या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहेत आणि कायम राहतील.  त्यांच्या योगदानाबद्दल शब्दांत वर्णन  करणं अवघड आहे.  त्यांचा इतिहास मालिकेतून साकार करताना मला खूप जास्त भावनिक जाणवतं". दरम्यान ही मालिका 5 जानेवारी 2026पासून स्टार प्रवाहवर 7:30 वर प्रसारित होणार आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget