TMKOC : ‘तारक मेहता..’च्या ‘गोकुळधाम सोसायटी’बद्दलच्या या’ खास गोष्टी माहितीयेत का?
Taark Mehta Ka ooltah Chashmah : अनेकांना वाटत की, ही गोकुळधाम सोसायटी मुंबईतील गोरेगाव भागात आहे. तुम्ही देखील असाच विचार करताय का? तर, थांबा!
![TMKOC : ‘तारक मेहता..’च्या ‘गोकुळधाम सोसायटी’बद्दलच्या या’ खास गोष्टी माहितीयेत का? Do you know these things about Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gokuldham society TMKOC : ‘तारक मेहता..’च्या ‘गोकुळधाम सोसायटी’बद्दलच्या या’ खास गोष्टी माहितीयेत का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/1722da7d300395d70dc3d69806b9432a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taark Mehta Ka ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taark Mehta Ka ooltah Chashmah) गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील ‘जेठालाल’, ‘बापुजी’, ‘टप्पू’, ‘दयाबेन’, ‘बबीताजी’, ‘भिडे’ यासह सगळीच पात्र खूप लोकप्रिय ठरली आहे. केवळ कथा आणि पात्रचं नाही तर, ही ‘गोकुळधाम सोसायटी’ देखील तितकीच प्रसिद्ध झाली आहे. ही मालिका पाहणाऱ्या प्रत्येकालाच वाटत की, आपण देखील अशाच एखाद्या सोसायटीमध्ये घर घ्यावं.
अनेकांना वाटत की, ही गोकुळधाम सोसायटी मुंबईतील गोरेगाव भागात आहे. तुम्ही देखील असाच विचार करताय का? तर, थांबा! ‘गोकुळधाम’ खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाही. ना ही सोसायटी आहे, ना इथे कोणाची घर आहेत.
गोकुळधाम सोसायटीत एकही घर नाही!
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी हा सेट तयार करण्यात आला आहे. या मालिकेचं चित्रीकरण गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरु आहे. याच ठिकाणी हा ‘गोकुळधाम सोसायटी’चा सेट बांधण्यात आला आहे. मात्र, या सोसायटीत ना कुठलं घर आहे, ना इथे कुणी राहत! इथे केवळ लाकडी भिंती आहेत आणि त्याला सजावटीसाठी लावण्यात आलेले दरवाजे आणि खिडक्या... गोकुळधाम सोसायटीमधील कुणाचेही घर इथे नाही.
मग घरं नेमकी कुठे आहेत?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं इंडोअर चित्रीकरण दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडत आहे. फक्त आऊटडोर शूटिंग करायचे असेल, तर त्यासाठी हा फिल्मसिटीतील सेट वापरला जातो. अर्थात केवळ बाल्कनी किंवा सोसायटीच्या आवारातील सीन इथे शूट केले जातात. तर, घराच्या आतील भागांचे चित्रीकरण हे कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये केले जात आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Kshitij Date : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार क्षितिज दाते
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)