Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला
Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Ram Gopal Varma : एकेकाळी बॉलीवूडचे अव्वल दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) आता फक्त तेलुगू सिनेमांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते त्यांच्या चित्रपटांना हिट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रमोशन करू शकतात. त्यामुळे राम गोपाल वर्मा अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादाचा भाग देखील बनले आहेत. अलीकडेच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. व्हिडीओमधील त्यांच्या कृत्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. स्वत: राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वटिर शेअर केलाय. राम गोपाल वर्मा त्यांच्या आगामी डेंजरस या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. परंतु, त्यासाठी त्यांनी वापरलेल्या पद्धतीवरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्री आशु रेड्डीच्या (ASHU REDDY) पायाची मसाज करत असल्याचे दिसत आहे. राम गोपाल वर्मा अभिनेत्रीसमोर जमिनीवर बसले आहेत. तर समोरच्या सोफ्यावर आशु रेड्डी बसली आहे. यावेळी मसाज करत असताना राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्रीच्या वायाचा चावा घेतलाय. हाच फोटो आणि व्हिडीओ त्यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केलाय. परंतु, हे सर्व अभिनेत्रीच्या परवानगीनेच झाल्याचे समोर आले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी हा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्याला एक हटले कॅप्शन देखील दिले आहे. आशु डेड्डीमध्ये धोकादायक चिन्ह कुठे आहे? असे कॅप्शन राम गोपाल वर्मा यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचे पाय हातात धरून राम गोपाल वर्मा जमिनीवर बसले आहेत आणि कॅमेराकडे बघत सायको लूकमध्ये पोज दिलीय.
Where is the DANGEROUS mark in ASHU REDDY ..Full video in 30 mints at 9.30 pm pic.twitter.com/34lp6eHjC5
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 6, 2022
अशाप्रकारे चित्रपटाचे प्रमोशन केल्यामुळे राम गोपाल वर्मा यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, राम सरांना असे पाहून वाईट वाटते. ते एके काळी भारतीय चित्रपटसृष्टीतील अव्वल दिग्दर्शक होते. सर्वच मोठ्या कलाकारांना त्याच्यासोबत काम करायचे होते.ठ" तर काही नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्मा यांचा दर्जा घसरल्याचे म्हटले आहे.
महत्वच्या बातम्या