एक्स्प्लोर

Dilip Kumar Photo: दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, ट्विटरवरुन शेअर केला लेटेस्ट फोटो

Dilip Kumar Health Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा आणि सायरा बानो यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

Dilip Kumar Health Update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा आणि सायरा बानो यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एका तासापूर्वीचा आहे, असं म्हटलं गेलं आहे. 

मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सध्या त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होत असून त्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, काल (रविवार) पासूनच दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी सायरा बानो यांनी प्रतिक्रिया दिली असून निधनाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरुनही हेल्थ अपडेट शेअर करण्यात आलं होतं. सायरा बानू यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं होतं की, दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. परंतु, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हेल्थ अपडेट जारी केलं होतं. 

p>

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल 

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत एबीपी न्यूजला माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत."

डिसेंबर 2020 पासूनच दिलीप कुमार यांची नाजूक आहे. अशातच सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आज सकाळी रुग्णालयातच दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती नाजूक आहे, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी आहे. यापूर्वीही दिलीप कुमार यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास चाहत्यांना सांगितलं होतं. 

याच मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget