एक्स्प्लोर

Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'

Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: देखणं व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि त्यासोबतच दमदार अभिनय याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीसुद्धा, पण कधीकाळी चर्चेत असलेल्या या अभिनेत्याच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली. 

Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: बॉलिवूडच्या (Bollywood News) या चमचमत्या जगात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार येतात. काहींना इथे यशाची पायरी गवसते, तर काहींच्या नशीबी आयुष्यभरासाठी स्ट्रगलच येतो. अनेकांचं तर बॉलिवूडमधल्या दिग्गजांसोबत अगदी जवळचं नातं असंत, पण तरीसुद्धा त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही. आम्ही आज अशाच एका अभिनेत्याबाबत बोलणार आहोत. तो अभिनेता म्हणजे,  दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे पुतणे अयूब खान (Ayub Khan). एक काळ असा होता की, ते बॉलिवूड (Bollywood Actor) आणि त्यासोबतच टेलिव्हिजन (Television Actor) जगतात चांगलेच चर्चेत होते. देखणं व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि त्यासोबतच दमदार अभिनय याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीसुद्धा, पण कधीकाळी चर्चेत असलेल्या या अभिनेत्याच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली. 

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचा पुतण्या असूनही या अभिनेत्याच्या नशीबानं अचानक एवढं वळण घेतलं की, त्याला काम मिळणंही कठीण झालेलं. अभिनेते अयूब खान (Dilip Kumar Nephew Ayub Khan) यांनी स्वतः कबुल केलेलं की, जर आता त्यांना लवकर काम मिळालं नाहीतर, त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ शकते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. त्यांच्या वैवाहिक आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखीच होती. अयूब खान यांनी दोन लग्न केली असून त्यातलं एक लग्न त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीसोबत केलेलं.

Ayub Khan Down to Last Pennies Now, Says he Will Ask For Financial Help if Lockdown Goes on

दिलीप कुमारांचा पुतण्या असूनही हिरोपासून साईड अॅक्टरपर्यंतचा प्रवास 

अयूब खानचा जन्म दिलीप कुमार यांचे बंधू नासिर खान आणि अभिनेत्री बेगम पारा यांच्या पोटी झाला. 1992 मध्ये 'माशूक' सिनेमाद्वारे त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, 'मृत्युदंड' सिनेमात त्यांनी माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) स्क्रिन शेअर केलेली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं. मात्र, त्यांचा सिनेक्षेत्रातील प्रवास हळूहळू मंदावला. मग, त्यांनी आपलं लक्ष दूरचित्रवाणी क्षेत्राकडे वळवलं, जिथे त्यांनी 'उतरन', 'शक्ती: अस्तित्व के एहसास की' आणि 'तेरे इश्क में घायल' यांसारख्या सुपरहिट मालिकांमधून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अगदी अलीकडेच, ते 'नीरजा – एक नई पहचान' या मालिकेत दिसले होते. आपल्या अभिनय कारकिर्दीत, अयूब खान यांनी आतापर्यंत 32 सिनेमे आणि 30 सिरीअल्समध्ये काम केलं.

दोन लग्न,  मावस बहिणीशीच थाटला संसार (Ayub Khan Marry With Cousin Sister)

अयूब खान यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेकदा सार्वजनिक चर्चेचा विषय ठरलेलं. 1992 मध्ये, त्यांनी आपल्या आत्याच्या मुलीशी, म्हणजेच आपल्या मावस बहिणीशी विवाह केला. मात्र, काही वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. या लग्नापूर्वी, महाविद्यालयीन दिवसांमध्ये अयूब खान यांचं निहारिका नावाच्या तरुणीवर प्रेम जडलं होतं. मात्र, त्यानंतर ती अमेरिकेला स्थायिक झाली होती. पुढे, या दोघांचा पुन्हा संपर्क झाला आणि अखेरीस त्यांनी विवाह केला. तरीही, 2016 मध्ये त्यांचं निहारिका यांच्यासोबतचं नातंही संपुष्टात आलं. अयूब खान यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही ठिकाणी, संघर्षांचा सामना करावा लागला. असं असूनही, आजही ते मेहनतीच्या जोरावर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. 

"बँक बॅलेन्स आता संपत आलाय... भीक मागावी लागेल..."

2021 साली काम मिळत नसल्यामुळे अयूब खान यांनी सर्वांसमोर आपली व्यथा मांडली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी सांगितलेलं की, या महामारीमुळे प्रत्येकाच्या कामावर परिणाम झाला असून सगळेच जण संघर्ष करत आहेत. जवळपास दीड वर्षांपासून त्यांच्याकडे कोणतंही नियमित काम नव्हतं आणि या काळात त्यांनी कोणतीही कमाई केली नव्हती, हीच त्यांच्यासाठी मोठी चिंता होती. परिस्थिती अशीच राहिली तर भिक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच त्यांचा बँक बॅलन्सही संपत आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asha Bhosle Son In Law: आशा भोसले यांचा जावई बॉलिवूडचा सुपरस्टार व्हिलन; ज्यानं केलेलं मेहुणीचं कन्यादान, आज मुलगी बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'

महत्त्वाच्या बातम्या

Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget