एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Actor in Rishabh Shetty Film: 'धुरंधर 2' मधील खलनायकाची चांदी; दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या ऐतिहासिक चित्रपटात संधी, 'ही' भूमिका साकारणार

Arjun Rampal role in Rishab Shetty new movie: रिषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटात 'धुरंधर 2' फेम अर्जून रामपाल खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती.

After Dhurandhar 2 Arjun Rampal Set for Powerful Role: सध्या जिकडे बघावं तिकडे 'धुरंधर'मय (Dhurandhar 2) वातावरण निर्माण झालं आहे.  'धुरंधर' चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 'धुरंधर 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.  'धुरंधर'च्या दुसर्‍या पार्टनेही बॉक्स ऑफिसवर (Box office) खळबळ उडवून दिलीये.  'धुरंधर 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून भारतीयांसह सातासमुद्रापार असणाऱ्या प्रेक्षकांनीही हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतलाय.  अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.  अवघ्या 4 दिवसांत या चित्रपटाने साधारण 400 कोटींचा आकडा पार केला.  लवकरच हा सिनेमा 1000 कोटींच्या बॉक्स ऑफिस क्लबमध्ये एन्ट्री करेल, यात शंका नाही. 

या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जून  रामपाल (Arjun Rampal), संजय दत्त, आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.   प्रत्येकाने उत्तमरित्या आपल्या भूमिका वठवल्या आहेत. अर्जून रामपालच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं. दरम्यान, अभिनेता अर्जून रामपालला लॉटरी लागली, असंच एकंदरित म्हणावं लागेल. कारण अभिनेत्याची साऊथ चित्रपटात वर्णी लागली आहे.  तो लवकरच साऊथ स्टार रिषभ शेट्टीच्या चित्रपटात दिसणार आहे.   

रिषभ शेट्टीला (Rishab Shetty) कांतारा चित्रपटामुळे  प्रसिद्ध मिळाली. तो आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिषभ शेट्टी सध्या 'द प्राई़ड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.   या चित्रपटातून महाराजांच्या शौर्याची कथा  संपूर्ण भारतवासियांना दाखवण्यात येणार आहे.  या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान,  या सिनेमातून आणखी एक तगडा कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

या सिनेमामध्ये 'धुरंधर' फेम अर्जून रामपालची एन्ट्री झाली आहे.  तो या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. परंतु, रिषभ शेट्टीच्या या चित्रपटात अर्जून रामपाल नेमकी कोणती भूमिका साकारणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  सध्या प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

'धुरंधर' चित्रपटात अर्जून रामपालने अगदी धुव्वाधार व्यक्तीरेखा साकारली.  त्यानं या चित्रपटात क्रूर मेजर इक्बालची भूमिका साकारली.  अर्जून रामपालने क्रूर व्यक्तीरेखा साकारुन प्रेक्षकांना धक्का दिला. आता अर्जून लवकरच रिषभ शेट्टीच्या नव्या सिनेमात दिसणार झळकणार आहे.  या सिनेमात तो मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget