Dharmendra Kissing Scene With Shabana Azmi: 'माझ्या एका किसनं लोक हादरुन गेले...'; 87 वर्षांचे धर्मेंद्र अन् 72 वर्षांच्या शबाना आझमींचा 'तो' लिपलॉक सीन
Dharmendra Kissing Scene With Shabana Azmi: नुकत्याच एका लेटेस्ट मुलाखतीत बोलताना धर्मेंद्र यांनी या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखेची आणि शबाना आझमींसोबतच्या किसिंग सीनची आठवण साऱ्यांना करुन दिली.

Dharmendra Kissing Scene With Shabana Azmi: बॉलिवूड म्हटलं की, गॉसिप आलंच. मग ते अफेअर्सबाबत असो किंवा एखाद्या सीनबाबत. किंवा मग एखाद्या अभिनेत्याच्या किसिंग सीनबाबत. सध्या बॉलिवूडमध्ये असाच एक किसिंग सीन पुन्हा चर्चेत आला आहे. ज्या किसिंग सीनच्या चर्चा रंगल्यात, तो किसिंग सीन म्हणजे, 89 वर्षांचे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि 74 वर्षांच्या अभिनेत्री शबाना आझमी यांच्यातला. बरं हा किसिंग सीन कोणत्याही नवख्या सिनेमातला नाही, हा सीन दोन वर्षांपूर्वी आलेल्या रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील आहे. नुकत्याच एका लेटेस्ट मुलाखतीत बोलताना धर्मेंद्र यांनी या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखेची आणि शबाना आझमींसोबतच्या किसिंग सीनची आठवण साऱ्यांना करुन दिली.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारे धर्मेंद्र तेव्हाही आणि आता वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर असून आताही अनेकींच्या गळ्यातील ताईत आहेत. धर्मेंद्र आपल्या थट्टा-मस्करीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. या सिनेमातून त्यांनी हे सिद्ध केलं की, त्यांची क्रेझ अजूनही संपलेली नाही. मुलाखतीत बोलताना त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधल्या त्यांच्या किसिंग सीनची आठवण करुन दिली. तसेच, त्यांचा आणि शबाना आझमींचा लिपलॉक सीन व्हायरल झाल्यानंतर त्यांनी रणवीरला काय सांगितलं हेसुद्धा त्यांनी सांगितलं.
रणवीर सिंहबाबत काय म्हणाले धर्मेंद्र?
एएनआयला दिलेल्या लेटेस्ट इंटरव्यूमध्ये धर्मेंद्रनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' फिल्ममध्ये शबाना आझमीसोबतचा किसिंग सीन चर्चेत आल्यानंतर त्यांनी रणवीरला सांगितलं की, रोमांस करायला कोणतीही वयाची मर्यादा नसते.
लिपलॉक सीन व्हायरल झाल्यानंतर त्यांनी रणवीर सिंहला मस्करीत काय सांगितलं? हे देखील अभिनेत्यानं सांगितलं. याबद्दल बोलताना धर्मेंद्र म्हणाले की, "मी रणवीरला सांगितलं होतं की, तू 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात खूप किस केले आहेस, पण, माझ्या एका किसनंच लोक हादरवून सोडलेलं"
ज्येष्ठ अभिनेत्यानं त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना त्याची तुलना शाहरुख खानच्या देवदास चित्रपटाशी केली. ते म्हणाले की, एका अर्थानं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील पात्र देवदाससारखंच होतं. तो देवदास जो दारू पिऊन असतो आणि त्याला काहीही आठवत नाही आणि भटकत राहतो. नंतर तो मरतो. हे दुःखद आहे, पण ती एक मनोरंजक कथा होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























