Dharmendra Fan Cried For Attend Last Rite: 'मला शेवटचं त्यांना पाहू द्या, चितेवर हे पैसे ठेवू द्या...'; धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानाबाहेर चाहती धायमोकलून रडली VIDEO
Dharmendra Fan Cried For Attend Last Rite: धर्मेंद्र यांच्या चाहतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहती धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत सोडण्याची विनंती पोलिसांना करत असल्याचं पाहायला मिळतंय.

Dharmendra Fan Cried For Attend Last Rite: बॉलिवूड (Bollywood) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानं बॉलिवूडवर (Bollywood News) शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या 'ही-मॅन'चं (He Man) जाणं प्रत्येकाच्या आयुष्यात पोकळी निर्माण करणारं ठरलं. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर एक रुग्णवाहिका आली आणि त्यावेळी अभिनेत्याच्या निधनाची बातमी बाहेर आली. मुंबईतील विलेपार्ले पवन हंस स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात धर्मेंद्र यांची चाहती धायमोकलून रडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
धर्मेंद्र यांच्या चाहतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहती धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत सोडण्याची विनंती पोलिसांना करत असल्याचं पाहायला मिळतंय. ती पोलिसांना सांगतेय की, "मला जाऊ द्या..." त्यानंतर, ती नोटांचं एक बंडल काढते आणि पोलिसांना ते दाखवून सांगते की, मला आत सोडा, मला हे पैसे त्यांच्या चितेवर ठेवायचेत... पण, पोलीस तिला आत जाऊ देत नाहीत. त्याच चाहतीच्या शेजारी आणखी एक महिला ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळतंय. हे सर्व पाहून धर्मेंद्र यांच्या जाण्याचा धक्का देओल कुटुंबियांसोबतच त्यांच्या मित्रपरिवारालाही बसल्याचं दिसून येतंय.
View this post on Instagram
चाहत्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर
धर्मेंद्र यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडीओमध्ये एका चाहत्यानं अभिनेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. तसेच, म्हटलंय की, त्याच्या निधनानं सर्वांनाच दुःख झालंय. धर्मेंद्र एक दयाळू व्यक्ती होता. त्यांचं हृदय खूप उदार होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























