एक्स्प्लोर

Hema Malini Viral Video After Dharmendra Cremation: धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला, अंत्यसंस्कारानंतर हेमा मालिनींचा पहिला VIDEO समोर

Hema Malini Viral Video: धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Hema Malini Viral Video After Dharmendra Cremation: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी जगाचा निरोप घेतला आणि ते अनंतात विलीन झाले. मुंबईतील (Mumbai News) विलेपार्ले (Vile Parle) येथील पवनहंस स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बस सहा दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टारला अखेरचा अलविदा करण्यासाठी जवळपास अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. तसेच, यावेळी संपूर्ण देओल कुटुंब शोकसागरात बुडालेलं. धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) आणि मुलगी ईशा देओल (Esha Deol) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपला आधार गमावलेल्या मायलेकी दुःखात पार बुडाल्याचं पाहायला मिळालं. अशातच सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आणि ईशा देओल मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर हात जोडताना दिसतायत.  

हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी जोडले हात 

सोशल मीडियावर आलेला हेमा मालिनी आणि ईशा देओलचा हा व्हिडीओ पिंकव्हिला इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ विले पार्ले स्मशानभूमीच्या बाहेरचा आहे. धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दोघी मायलेकी दिसल्या. व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू स्पष्टपणे दिसत आहेत. हेमा आणि ईशा यांनीही माध्यमांसमोर अक्षरशः रडत रडतच हात जोडले. दोघींना पाहून नेटकरीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, त्यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. काहींनी व्हिडीओवर कमेंट करतच म्हटलंय की, "या दुःखाच्या काळात त्यांना एकटं सोडा, त्यांना त्रास देऊ नका..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

कुठे झाले धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार? 

हिंदी सिनेमांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या जगाचा निरोप घेतला. सोमवारी म्हणजे,  24 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मेंद्र यांचं निधन झालं. मुंबईत विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. 

अंत्यसंस्कारावेळी कोण-कोण झालं सामील?

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शबाना आजमी, पूनम ढिल्लों यांच्यासह अनेक बडे स्टार्सही धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Pilgaonkar On Dharmendra: 'धरमजींना दिग्दर्शित करणं, माझ्यासाठी खूपच खास होतं...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितला धर्मेंद्रंचा 'तो' किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
Vishal Dadlani On Jantar Mantar Protest: 'किती दिवस वळवळणार आहात? लाज वाटू द्या...', जंतरमंतरवर पोरांची डोकी फोडताच विशाल दादलानींच्या भावनांचा कडेलोट; VIDEO
'किती दिवस वळवळणार आहात? लाज वाटू द्या...', जंतरमंतरवर पोरांची डोकी फोडताच विशाल दादलानींच्या भावनांचा कडेलोट; VIDEO
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
Monday Box Office Collection: मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget