Dharmaveer 2 : "असा हा धर्मवीर...." सुखविंदर सिंगच्या आवाजात गाणं, आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला
Dharmaveer 2 : धर्मवीर-2 सिनेमातील असा धर्मवीर हे गाणं आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने लॉन्च करण्यात आलं आहे.
Dharmaveer 2 : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आज पुण्यतिथीचे औचित्य साधून "धर्मवीर 2" (Dharmaveer 2) या आगामी चित्रपटातील "असा हा धर्मवीर...." हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. बहुप्रतीक्षित "धर्मवीर - 2" चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 27 सप्टेंबरला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
आनंद दिघेंची वेगवेगळी रुपं दाखवणारं, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारं असे हे गाणं आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडगोळीने या संगीतबद्ध केलं आहे. सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
'धर्मवीर-2' मधील गाण्यांविषयी उत्सुकता
"धर्मवीर -2" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे "धर्मवीर - 2" मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.
सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे आनंद दिघे या गाण्यात दिसतात. या गाण्यातून 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' उलगडण्यात आली असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यामुळे आता चित्रपटात 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.
View this post on Instagram
'धर्मवीर-2' ची रिलीज डेट पुढे ढकलली
'धर्मवीर 2' चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा निर्णय घेत राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 'धर्मवीर - 2' चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. बहुचर्चित 'धर्मवीर - 2' या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलं आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हे अस्मानी संकट पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. आता हा सिनेमा येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ही बातमी वाचा :
Kangana Ranaut : कंगनाच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; आता भाजपनेही हात झटकले