एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगनाच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; आता भाजपनेही हात झटकले

Kangana Ranaut : कंगना रणौत हिने शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून असहमती दर्शवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी देखील कारवाईची मागणी केलीये. 

Kangana Ranaut : दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी महिलांवरही बलात्कार झाले होते, असं वक्तव्य अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या वक्तव्यावर तीव्र संपात व्यक्त केला होता. त्यातच आता कंगनाच्याच पक्षाकडून म्हणजेच भाजपकडूनही या वक्तव्यावरही असहमती दर्शवण्यात आली आहे. 

भाजपकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये कंगनाने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कंगनावर काही कारवाई करण्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

रोहित पवारांनी काय म्हटलं होतं?

रोहित पवारांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, त्या एक कलाकार आहेत. त्या आता खासदार झाल्यात, त्यामुळे त्यांना राजकारणाचं काय माहित? ज्या विषयी माहिती नाही, याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि सरकार, भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करतो.

अधिकृत पत्र जारी करत भाजपने हात झटकले

दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, 'भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावर जे मत व्यक्त केलं आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे पक्षाचं मत नाही. भारतीय जनता पार्टी त्यांच्या या मताशी असहमत आहे. पक्षाच्या कोणत्याही विषयाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार आणि परवानगी देण्यात आलेली नाही.' 

भाजपकडून कंगना सक्त ताकीद

पुढे या पत्रात भाजपकडून कंगनाला सक्त ताकीदही देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं की, 'पक्षाकडून खासदार कंगना रणौत यांना अशाप्रकारचे वक्तव्य पुन्हा करु नये अशी सक्त ताकीदही देण्यात येत आहे.'

कंगनाचं वक्तव्य काय होतं?

दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला आहे. तिच्या या आरोपांवर शेतकरी संघटनांनीही संताप व्यक्त केला.                                                         


Kangana Ranaut : कंगनाच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; आता भाजपनेही हात झटकले

Kangana Ranaut On Farmers Protest : कंगना रणौत पुन्हा बरळली, शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार, अनेकांना संपवलं असल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
Ranveer SIngh On Ambani Family:'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
'धुरंधर'च्या प्रचंड यशासाठी रणवीर सिंहनं मानले अंबानी कुटुंबाचे आभार; म्हणाला' माझ्या करियरच्या कठीण काळात...'
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget