Dhanashree Verma On Yuzvendra Chahal Divorced: 'त्याला डेटिंगशिवाय माझ्याशी लग्न करायचं होतं...', युझीसोबतच्या लग्नाबद्दल धनश्रीचा पुन्हा धक्कादायक खुलासा
Dhanashree Verma On Yuzvendra Chahal Divorced: कधीकधी पवन सिंहसोबतच्या तिच्या मैत्रीचं कौतुक केलं गेलं, तर कधीकधी ती तिच् वक्तव्यामुळे चर्चेत राहिली.

Dhanashree Verma On Yuzvendra Chahal Divorced: अश्नीर ग्रोव्हरच्या (Ashneer Grover) 'राईज अँड फॉल' ((Rise and Fall)) या नव्या रिअॅलिटी शोमध्ये अनेक प्रसिद्ध स्टार्स सहभागी झालेत. यामध्ये क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची घटस्फोटीत पत्नी, युट्यूबर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माचाही समावेश आहे. धनश्री शो सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. कधीकधी पवन सिंहसोबतच्या तिच्या मैत्रीचं कौतुक केलं गेलं, तर कधीकधी ती तिच् वक्तव्यामुळे चर्चेत राहिली.
या शोमध्ये तिनं क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या स्पर्धकांशी चर्चा केली आणि आता ती पुन्हा त्याच कारणामुळे चर्चेत आहे. अलिकडच्याच एका भागात धनश्रीनं तिचं लग्न कसं झालेलं आणि चहलनं भेटल्यावरच तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव कसा ठेवला, याबाबत सांगितलं. धनश्री शोमध्ये अभिनेता अर्जुन बिजलानीशी बोलत होती, जेव्हा अभिनेत्यानं तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यावेळी तिनं सांगितलं की, युजवेंद्रला डेटिंगशिवाय लग्न करायचं होतं.
युजवेंद्रला डेटिंगशिवाय लग्न करायचं होतं
अर्जुननं ज्यावेळी तिला लग्नाबद्दल विचारलं त्यावेळी तिनं सांगितलं की, "आमचं लव्ह आणि अरेंज दोन्ही प्रकारे लग्न झालं असं म्हणता येईल... पण सुरुवात अरेंज्डनं झाली. सुरुवातीला युजवेंद्रला डेटिंग केल्याशिवाय लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यावेळी असं कोणतंही प्लॅनिंग नव्हतं... पण या संपूर्ण प्रोसेमध्ये प्रेमानं माझा होकार मिळवला गेला..."
आमचा ऑगस्टमध्ये रोका (एंगेजमेंट) झाला आणि नंतर डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. त्या काळात मी त्याच्यासोबत ट्रॅव्हल करत असायचे आणि आम्ही एकत्चर राहायचो. तेव्हापासून मला त्याच्या वागण्यात सूक्ष्म बदल जाणवू लागले. लोकांना कधीकधी काहीतरी हवं असतं आणि ते कधी मिळतं यात खूप फरक आहे..."
धनश्रीनं सर्वोतोपरी प्रयत्न केले
धनश्रीनं पुढे बोलताना सांगितलं की, जरी मला त्याच्यात होत असलेले बदल जाणवत होते, तरीसुद्धा मी त्याच्यावर आणि त्याच्यासोबतच्या नात्यावर पूर्ण विश्वास ठेवला. माझ्या अडचण अशी आहे की, मी माझ्या अगदी जवळ असलेल्यांना खूप समजून घेते, त्यांना खूप संधी देते... पण अखेर एका क्षणी मला असं वाटलं की, आता बस्स झालं... मी माझ्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि माझे एक हजार टक्के दिले. मला त्याची नेहमीच काळजी वाटत राहील, एवढी मी खात्री देऊ शकते..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























