एक्स्प्लोर

Dhanashree Verma Breaks Silence On 60 Crore Alimony: घटस्फोटावेळी युजवेंद्र चहलकडून खरोखर 60 कोटींची पोटगी मागितलेली का? धनश्री कॅमेऱ्यासमोर स्पष्टच बोलली...

Dhanashree Verma Breaks Silence On 60 Crore Alimony: धनश्रीनं युजवेंद्र चहलकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. अशातच आता धनश्रीनं स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Dhanashree Verma Breaks Silence On 60 Crore Alimony: भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेत असलेल्या घटस्फोटांपैकी एक प्रकरण म्हणजे, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर आणि कंटेंट क्रिएटर धनश्री वर्मा यांनी डिसेंबर 2020 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही, दोनच वर्षांत जून 2022 मध्येच हे जोडपं वेगळं झालं. आणि मार्च 2025 मध्ये कायदेशीर घटस्फोट घेऊन आपलं नातं संपवलं. अशातच ज्यावेळी दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला, त्यावेळी धनश्रीनं युजवेंद्र चहलकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. जे धनश्रीच्या कुटुंबानं अधिकृतपणे नाकारलं. पण नेमकं सत्य काय? याचा खुलासा आता स्वतः धनश्रीनं केला आहे. धनश्री सध्या 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय. अलिकडच्याच एका भागात तिनं तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हटलं की, 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. 

'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये (Rise And Fall Realty Show) आदित्य नारायणनं धनश्री वर्माला घटस्फोट होऊन किती दिवस झाले, असं विचारलं. यावर धनश्री वर्मानं उत्तर दिलं की, "अधिकृतपणे जवळजवळ एक वर्ष झालंय..." त्यावर कुब्रा सैत म्हणाली की, त्यांचा घटस्फोट खूप लवकर झाला, ज्यावर धनश्री म्हणाली की, घटस्फोट लवकर झाला कारण तो आपसी सहमतीनं झालेला, म्हणून जेव्हा लोक पोटगी म्हणतात, तेव्हा ते चुकीचं आहे. मी काहीही बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? माझ्या पालकांनी मला फक्त ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, त्यांना समजावून सांगायला शिकवलं आहे. ज्यांना आपण ओळखतही नाही, त्यांना समजावून सांगण्यात वेळ का वाया घालवायचा?"

पोटगीच्या आरोपांवर काही बोलण्याची कधी गरज नाही वाटली? 

नयनदीप रक्षित धनश्रीला विचारतो की, जेव्हा तुझ्यावर पोटगीचा आरोप झाला, तेव्हा तुला कधी काही बोलण्याची गरज वाटली का? धनश्रीनं उत्तर दिलं की, "जेव्हा आपण असं काहीतरी घडताना पाहतो, तेव्हा फारच दुःख होतं, ते आवश्यक नव्हतं. त्यात काहीही खरं नाही. त्यानं असं का केलं? याचा विचार करून मला आणखी वाईट वाटलं? पण काहीही झालं, तरी मी नेहमीच त्याचा आदर करिन, मी तेच मानते. आता, मला वाटत नाही की, मी कोणालाही डेट करू शकते..."

दरम्यान, अश्नीर ग्रोव्हर होस्ट करत असलेला शो 'राईज अँड फॉल' हा अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर आणि सोनी टीव्हीवर प्रसारित होतोय. यात किकू शारदा, आहाना कुमरा, आकृती नेगी, अनाया बांगर, अर्जुन बिजलानी, अरबाज पटेल, सचिन बाली आणि अरुष भोला सहभागी झाले आहेत. नूरिन शाह पहिल्या आठवड्यातच बाहेर पडली, तर पवन सिंह आणि संगीता फोगट यांनी स्वेच्छेनं शो सोडला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: 'ज्यावेळी मी प्रग्नेंट होते, त्यावेळी हे दोघं...'; कुनिका सदानंदसोबतच्या अफेअरवर कुमार सानूंच्या घटस्फोटीत पत्नीनं सगळंच सांगून टाकलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget