एक्स्प्लोर

Dhamaal 4 Box Office Collection'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?

इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. सुरुवातीला चित्रपटाभोवती फारसा गाजावाजा नसला तरी प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.

Dhamaal 4 Box Office Collection: अजय देवगणचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' (Dhamaal 4) अखेर प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, फारसा गाजावाजा किंवा मोठे प्रमोशन नसतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कमाई करत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' आणि आलिया भट्टच्या 'अल्फा' सारखे चित्रपट आधीपासूनच थिएटरमध्ये असतानाही 'धमाल 4'ने दमदार एन्ट्री करत बॉक्स ऑफिसवर स्वतःची छाप पाडली आहे. (Box Office Collection)

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कमाई?

इंद्र कुमार दिग्दर्शित 'धमाल 4' शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. सुरुवातीला चित्रपटाभोवती फारसा गाजावाजा नसला तरी प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. Sacnilkच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 13.75 कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही 'धमाल 4'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील ग्रॉस कलेक्शन आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाने जगभरात एकाच दिवसात 21.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवशी 33 टक्के ऑक्युपन्सीसह चित्रपटाच्या कमाईत 60.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई 36.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'वेलकम 3' आणि 'अल्फा'वर परिणाम

'धमाल 4'च्या प्रदर्शनानंतर इतर चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाल्याचे दिसून आले. 'वेलकम टू द जंगल', जो गुरुवारी 2 कोटींपेक्षा अधिक कमाई करत होता, त्याची कमाई शुक्रवारी घसरून 1 कोटी रुपयांवर आली. तर आलिया भट्टच्या 'अल्फा'ने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 1.65 कोटी रुपयांची कमाई केली. कॉमेडीचा तडका, लोकप्रिय स्टारकास्ट आणि 'धमाल' फ्रँचायझीची लोकप्रियता यामुळे 'धमाल 4'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.

दरम्यान, 'धमाल 4'ने अजय देवगणच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'दे दे प्यार दे 2'ला मागे टाकले आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 12.25 कोटी रुपयांची (नेट) कमाई केली होती आणि दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 21 कोटी रुपये होते. याशिवाय 'सन ऑफ सरदार 2'पेक्षाही 'धमाल 4'ची कामगिरी चांगली ठरली आहे. 'सन ऑफ सरदार 2'ने दुसऱ्या दिवशी 8.25 कोटी रुपयांची (नेट) कमाई केली होती, तर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 15.50 कोटी रुपये होते.

'टोटल धमाल'चा विक्रम अजूनही दूर

'धमाल 4'समोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टोटल धमाल'चा विक्रम. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी 20.40 कोटी रुपयांची (नेट) कमाई केली होती आणि अखेरीस भारतात 155.67 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करत मोठे यश मिळवले होते.'धमाल 4'ने दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ केली असली तरी 'टोटल धमाल'च्या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. हा चित्रपट 2019 मधील 'टोटल धमाल'चा सिक्वेल आहे.चित्रपटात अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख, ईशा गुप्ता आणि विजय पाटकर यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget