देवदास फेम अभिनेत्रीचं निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Devdas fame actress Nazima passed away : देवदास फेम अभिनेत्रीचं निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Devdas fame actress Nazima passed away : देवदास फेम अभिनेत्री nazima यांचं निधन झालंय. वयाच्या 77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. चित्रपटांमध्ये मैत्रीण आणि बहिणीच्या सहाय्यक भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. नाजिमा यांनी 60 आणि 70 च्या दशकातील अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले. त्या काळातील बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी बहिणी आणि मैत्रीण अशा सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.
बॉलिवूडची ‘रेसिडेंट सिस्टर’ म्हणून लोकप्रिय
25 मार्च 1948 रोजी नाशिक येथे जन्मलेल्या नाजिमा यांना बॉलिवूडच्या ‘रेसिडेंट सिस्टर’ म्हणून ओळखले जात होते. नाजिमा यांचे निधन सोमवार, 11 ऑगस्ट रोजी झाले. त्या आपल्या दोन मुलांसह मुंबईतील दादर येथे राहत होत्या. नाजिमा यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या चुलत भावाने, जरीन बाबूंनी, सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली.
बालकलाकार म्हणून सुरुवात
नाजिमा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार ‘बेबी चंद’ या नावाने दो बीघा जमीन या चित्रपटातून केली होती, ज्यात त्यांनी दोन बहिणींमधील मोठ्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी देवदास चित्रपटात लहान पारोची क्लासमेटची आणि बिराज बहू मध्ये अभी भट्टाचार्य यांची बहीण अशी भूमिका साकारली होती. नाजिमा यांना राज कपूर निर्मित बालचित्रपट अब दिल्ली दूर नहीं मध्येही पाहायला मिळाले होते.
या चित्रपटांतही झळकल्या
नंतर त्यांनी निशान (है तबस्सुम तेरा) आणि राजा और रंक (ओ फिरकी वाली आणि संग बसंती) मध्ये संजीव कुमारसोबत अभिनय केला. त्यांनी राजेश खन्नासोबत औरत आणि डोली चित्रपटांत काम केले. याशिवाय त्या मनचली, प्रेम नगर, अनुराग, बेईमान इत्यादी चित्रपटांत दिसल्या. नाजिमा यांनी आए दिन बहार के (ऐ काश किसी दीवाने को) मध्ये आशा पारेख यांच्या बहिणीची भूमिका केली होती. 1972 मध्ये बेईमान चित्रपटात नाजिमा यांनी मनोज कुमार यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























