एक्स्प्लोर

एकीकडे पती रणवीर सिंहची 'धुरंधर 2' मधून धुव्वाधार कमाई, तर दुसरीकडे दीपिका पदुकोण ट्रोल; कारण काय?

Deepika Padukone Trolled: धुरंधर 2 चित्रपट प्रदर्शित होताच रणवीर सिंहचं प्रचंड कौतुक. पण दीपिका पदुकोण होतेय ट्रोल.

Why Deepika Padukone is being trolled Dhurandhar 2: रणवीर सिंह स्टारर धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुव्वाधार कमाई करण्यास सुरुवात केलीये. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत. धुरंधरच्या दुसऱ्या पार्टवर प्रेक्षकांसह इंडस्ट्रीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी सोशल मीडिया अक्षरश: 'धुरंधर'मय करुन टाकलं आहे.  विशेषत: अभिनेता रणवीरचं विशेष कौतुक होत आहे.  त्यानं साकारलेलं जसकिरत आणि हमजा हे पात्र कौतुकास्पद होतं. रणवीरचा ट्रान्सफॉर्मेशन देखील कमाल होता. परंतु, एकीकडे रणवीरचं कौतुक होत असताना, त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियात ट्रोल होत आहे. ट्रोल होण्यामागचं कारण काय? याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण ना धुरंधर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली, ना तिचा पती रणवीर सिंहसाठी किंवा चित्रपटासाठी पोस्ट शेअर केली. हीच  गोष्ट सध्या चाहत्यांना खटकत आहे. चित्रपट  इतका मोठा हिट होऊनही दीपिकाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद का आला नाही? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावरील अनेक वापरकर्ते उपस्थित करत आहेत. 

सोशल मीडियावर हा वाद तेव्हा वाढला, जेव्हा स्क्रीनिंग मिस केल्यानंतर दीपिका आपल्या सासरच्या मंडळींसोबत एक कॉन्सर्टमध्ये दिसली.  तिचे कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका युझरने या पोस्टवर, 'ती नवऱ्याच्या चित्रपटासाठी वेळ न काढता कॉन्सर्टला गेली', अशी कमेंट केली आहे.  काही जण दीपिकावर टीका करत असताना, काही  नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली आहे. 

एका नेटकऱ्याने आपले मत व्यक्त करत म्हटलं की, 'प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे वैयक्तिक आयुष्य आहे.  तसेच प्राधान्यक्रम असतात, जे समजून घेणे महत्त्वाचे आणि गरजेचं आहे', असं म्हटलं आहे. 

केवळ हे प्रकरण नाही, दीपिका  सोशल मीडियावर बऱ्याचदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. मात्र, अभिनेत्री कधीही उघडपणे  कोणत्याही विषयावर जाहीरपणे भाष्य करत नाही. धुरंधर 2 सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. चित्रपटातील रणवीर सिंहच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढत चालला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget