एक्स्प्लोर

Deepika Padukone Birthday : एकेकाळी आयुष्य संपवायच्या विचारात होती दीपिका पादुकोण; आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर

Deepika Padukone Birthday : 'ओम शांत ओम'मधून (OM SHANTI OM) सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली.

Deepika Padukone Birthday : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'ओम शांत ओम'मधून (OM SHANTI OM) सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली. आज तिचा 38 वा वाढदिवस (Deepika Padukone Birthday) आहे. मात्र, एकेकाळी दीपिका नैराश्यात होती. इतकेच नाही तर तिने अनेकदा आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. 

सध्या दीपिका तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे फार आनंदी आहे. मात्र, एका प्रेम प्रकरणामुळे ती नैराश्यात गेली होती. "कॉफी विथ करण" (koffee with karan) या शो मध्ये दीपिकाने याबाबत खुलासा केला होता. "रणबीर कपूर बरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर स्वत:ला सावरणे खूप कठीण होते", असे दीपिका म्हणाली होती. दीपिकाने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर काही वर्षांतच दीपिका आणि रणबीर कपूरच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. 

'कॉफी विथ करण'मध्ये काय म्हणाली दीपिका?

रणबीर (Ranbeer Kapoor) सोबतचे माझे नाते माझ्यासाठी सर्वांत महत्वाचे होते. तेच माझे आयुष्य झाले होते. मी शहरात नवीन होते. त्याचे सर्व मित्र माझे देखील मित्र झाले होते. यातून मी बरंच काही शिकले. मला या घटनेने चांगली व्यक्ती होण्यासाठी मदत झाली, असे मत दीपिकाने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये मांडल होतं.

नैराश्यातून सावरत दीपिकाने बॉलिवूडमध्ये गाठली वेगळी उंची 

नैराश्याचा दीपिका पादुकोणने ठामपणे सामना केला. त्यातून सावरली. तिने यानंतर अनेक फ्लॉप सिनेमेही केले. तिने पुन्हा मेहनत घेत बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. दरम्यान, यानंतर तिने अनेक हिट सिनेमे केले. बाजीराव मस्तानी ते सध्याच्या जवानपर्यंत दीपिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

दीपिका पादुकोणकडून आई होणार असल्याचे संकेत 

बॉलिवूड अभिनेता रणबीर बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने रणवीर सिंह बरोबर संसार थाटला. तिने 2018 मध्ये रणवीर सिंहबरोबर लगीनगाठ बांधली. दरम्यान आता वयाच्या 38 व्या वर्षी दीपिकाने आई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. वोग सिंगापुरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोण म्हणाली,"रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही", असं आवर्जुन सांगतात. 

दीपिका पुढे म्हणाली,"इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय जमिनीवरच आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझा कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवरदेखील असेच संस्कार करू". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dose of entertainment 🤓 (@random.shitszz)

 

इतर महत्वाच्या बातम्या 

Gautami Patil: "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम" गाण्यावर गौतमीचा जबरदस्त डान्स; पण व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, नेमकं प्रकरण काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget