Ranveer Deepika Video : दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं प्रमोशन; कारमध्ये "झुमका" गाण्यावर थिरकली, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला.
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : नुकताच रिलीज झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. लोकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून धरला आहे. या चित्रपटाबद्दल अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नुकताच रणवीरने दीपिकाचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात दीपिका 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील "झुमका" गाण्यावर डान्स गाण्यावर नाच करताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
कारमध्ये केला दीपिकाने केला नाच
व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिका कारच्या आत दिसत आहेत. दरम्यान, दीपिका रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मधील 'झुमका' गाण्याचे हुक-स्टेप करत आहे. सोबतच दीपिका चित्रपटातील रणवीरच्या राॅकी या पात्राची हुबेहुब नक्कल करत आहे. संबंधित व्हिडीओच्या शेवटच्या भागाता दीपिका रणवीरला म्हणते, तुझ्यासारखे कोणीच करू शकत नाही. व्हिडीओ पोस्ट करत रणवीरने खाली लिहिले आहे, तिला चित्रपट खूप आवडला आहे.
आलिया भट्टने दिली प्रतिक्रिया
हा व्हिडिओ आलिया भट्टने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उत्कृष्ट.' सोशल मीडियावरही चाहते दीपिकाच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.
चित्रपट 28 जुलै रोजी आला प्रेक्षकांच्या भेटीस
करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेमकहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीरशिवाय आलिया, शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाची कथा रॉकी रंधावा म्हणजेच रणवीर सिंग आणि राणी चॅटर्जी म्हणजेच आलिया भट्ट यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 19.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 46.33 कोटी रुपये झाले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.