(Source: ECI | ABP NEWS)
Deepika Padukone Is Out Of Kalki 2: दीपिका पादुकोणला आणखी एक झटका; 'स्पिरिट' नंतर Kalki 2 चित्रपटातूनही बाहेरचा रस्ता? ही मागणी पडली महागात
Deepika Padukone Is Out Of Kalki 2: 'स्पिरिट' पाठोपाठ आता दीपिका पादुकोण 'कल्कि 2'मधूनही बाहेर? इन्स्टा पेजवरच्या पोस्टमुळे खळबळ.

Deepika Padukone Is Out Of Kalki 2: बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Director Sandeep Reddy Vanga) यांनी 'स्पिरिट' (Spirit Movie) सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि तिच्याऐवजी तृप्ती डिमरीला कास्ट केलं. तेव्हापासूनच इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. अशातच आता दीपिकाला 'स्पिरिट' पाठोपाठ प्रभासच्या 'कल्की 2'मधून बाहेर काढलं जाण्याची माहिती मिळत आहे.
Bollywood.mobi नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की, दीपिका पादुकोण आई झाल्यानंतर तिच्या कामाचे काही तास कमी करण्याची मागणी होत आहे. यामुळे सेटवर तणाव निर्माण होत आहे. परिणामी 'कल्की 2'चे निर्माते तिची भमिका कमी करण्याचा किंवा सिनेमातून काढून टाकण्याचाच विचार करत आहे. दरम्यान, हे वृत्त केवळ Bollywood.mobi नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरच्या पोस्टवरुन देत आहोत. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दीपिकाला 'कल्की 2'मधूनही दाखवला जाणार बाहेरचा रस्ता?
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिका पादुकोणला प्रभास स्टारर सिनेमा 'स्पिरिट'मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता. दिवसेंदिवस दीपिकाच्या मागण्या वाढत होत्या. ज्यात आठ तासांची शिफ्ट, जास्त पगार आणि चित्रपटाच्या नफ्यात वाटा यांचा समावेश होता. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना तिच्या वाढत्या मागण्या खटकल्या. त्यामुळे 'स्पिरिट'मधून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, नुकतीच आई झालेली दीपिका तिचे कामाचे तास कमी करुन तिचं काम आणि वैयक्तिक आयुष्य कुठेतरी संतुलित करण्याचा प्रयत्न करतेय. तसेच, तिला तिच्या मुलीलाही वेळ द्यायचा आहे, अशी माहिती मिळत आहे.
संदीप रेड्डी वांगा यांनी जाहीरपणे व्यक्त केला संताप
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट करत दीपिकावर राग व्यक्त केलेला. त्यांनी दीपिकावर 'घाणेरडे पीआर गेम' खेळण्याचा आरोप करत टीकाही केली. संदीप रेड्डी वांगा यांनी ट्वीटमध्ये लिहिलेलं की, "जेव्हा मी कोणत्याही अभिनेत्याची कहाणी ऐकतो, त्यावेळी मी 100 टक्के विश्वास ठेवतो. आमच्यात एक अघोषित एनडीए आहे. पण, असं करुन तुम्ही त्या व्यक्तीची पोलखोल केलीय, जी तुम्ही खऱ्या आयुष्यात आहात. एका तरुण अभिनेत्याला कमीपणा दाखवणं आणि माझी स्क्रिप्ट सर्वांसमोर आणणं? हेच तुझं फेमिनिझम आहे?"
संदीप रेड्डी वांगा यांनी लिहिलंय की, "एक चित्रपट निर्माता म्हणून, मी माझ्या क्रिएटिविटीमागे वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत आणि माझ्यासाठी, चित्रपट निर्मिती हेच सर्वस्व आहे. तुम्हाला ते समजत नाही. तुम्हाला ते समजत नाही. तुम्हाला ते कधीच कळणार नाही. एक काम कर... पुढच्या वेळी सगळीच स्क्रिप्ट सांग... कारण मला अजिबात फरक पडत नाही. #dirtyPRgames. मला हे खूप आवडतात, खिसियानी बिल्ली खंबा नोचे!"
'स्पिरिट'मध्ये दीपिकानं तृप्ती डिमरीला केलं रिप्लेस
दीपिकानं चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, तृप्ती डिमरी ही संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीनं यापूर्वी 'अॅनिमल' मध्ये दिग्दर्शकासोबत काम केलं होतं. तिनं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे 'स्पिरिट' मधील तिच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























