एक्स्प्लोर

Cup Bashi Movie Movie Poster Launch: प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?

Cup Bashi Movie Movie Poster Launch: वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा 5 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.  

Cup Bashi Marathi Movie Poster Launch: सासू-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता 'कप-बशी' या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा 5 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.   

सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने 'कप बशी' या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात अभिनेत्री  निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), पूजा सावंत (Pooja Sawant) अभिनेता ऋषी मनोहर (Rishi Manohar), नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे , चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे यात शंका नाही.गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना  चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cup-Bashi (@cup_bashi_official)

अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु ​अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सूनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचे पुढे लग्न जुळत की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर 'कप बशी' हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असल्यानं प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन अनुभवायला मिळेल त्यासाठी 5 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget