एक्स्प्लोर

Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा

Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये येण्यासाठी समरने तब्बल 25 लाख रुपये ऑफर केल्याचा खुलासा सुनील पाल यांनी केलाय.

Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: सतत चर्चेत असणारा प्रसिद्ध कॉमेडीयन समय रैना (Samay Raina) त्याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' (India's Got Latent) या रिअ‍ॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनसह परतलाय. या शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) या दोघीही गेस्ट म्हणून उपस्थित होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. आता, यावरून कॉमेडीयन सुनील पाल (Comedian Sunil Pal) यांनी समय रैना आणि आलिया भट्ट या दोघांवरही निशाणा साधला आहे.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये, जेव्हा पापाराझींनी सुनील पाल (Sunil Pal) यांना विचारलं की, आलिया भटसारख्या मोठ्या स्टार्सनी अशा शोमध्ये का जावं? जिथे शिवराळ भाषेचा वापर केला जातो, तेव्हा त्यांनी जळजळीत आणि शायराना अंदाजात टिका केली. हसत-हसत ते म्हणाले की, "जहां-जहां हैं आलिया, वहां-वहां हैं गालियां! बजाओ तालियां, वरना सपने में आएगा विजय माल्या..." सुनील पाल यांचं वक्तव्य आलिया भटच्या उपस्थितीवर आणि शिवराळ भाषेचा वापर असलेल्या शोमध्ये जाण्यासंदर्भात करण्यात आलेली टीका होती. 

समय रैनानं सुनील पाल यांना दिलेली 25 लाखांची ऑफर? (Samay Raina 25 Lakh Offer To Sunil Pal?)

कॉमेडियन सुनील पाल यांनी पॅपाराझींशी बोलताना एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासाही केलाय. सुनील पाल म्हणाले की, "समयनं मला 25 लाख रुपयांची ऑफरही दिली होती. पण, मी त्याला स्पष्टच सांगितलं की, मी शिव्या देणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला की, तुम्ही देऊ नका... पण, आम्ही देऊ..." त्यानंतर सुनील पाल यांना विचारलं की, आलिया आणि शर्वरीनंही शिव्या दिल्या नाहीत. तेव्हा सुनील पाल म्हणाले, "जहां जहां आलिया, वहां वहां है गालिया...बजा दो तालियां, वरना सपने में आएगा विजय माल्या".

समय रैनाबद्दल बोलताना सुनील पाल यांनी एक भुवया उंचावणारा दावा केलाय. ते म्हणाले की, "समय रैनाचे सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तो स्वतः मला फॉलो करतो. यावरून हे दिसून येतंय की, तो योग्य व्यक्तीला फॉलो करतोय आणि नक्कीच आपलं ध्येय गाठेल..." सुनील पाल यांनी पुढे सांगितलं की, समय रैनानं यापूर्वी त्यांना आपल्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती आणि त्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफरही दिली होती.

सुनील पाल यांनी समय रैनासमोर ठेवलेली अट (Sunil Pal Condition To Samay Raina)

सुनील पाल यांनी सांगितलं की, समय रैना यांच्या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी एक अट घातली होती. त्यांनी समय रैनाला सांगितलेलं की, "मी तुझ्या शोमध्ये नक्कीच येईन, पण एक अट आहे की, त्यात कोणतीही अश्लील भाषा किंवा शिवराळपणा वापरला जाणार नाही. तू मला मानधन दिलं नाहीस तरी चालेल, पण मी शिवराळ भाषेच्या वापराचं समर्थन करणार नाही..." सुनील पाल यांच्या मते, विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि शिवराळपणा सादर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, या आपल्या ठाम भूमिकेवर ते आजही ठाम आहेत. 

कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त

सुनील पाल यांनी समय रैना यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट' (India's Got Latent) या शोबाबत चिंता व्यक्त करताना सांगितलं की, या शोमध्ये समाजाच्या हिताचे बदल व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले की, "समय रैना यांनी हा शो अशा प्रकारे घडवावा की, लोक तो आपल्या पालकांसोबत आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांसोबत एकत्र बसून पाहू शकतील. शोचं स्वरूप असं असावं ज्यामुळे घरातील ज्येष्ठांचा आदर राखला जाईल आणि तेही तो शो पाहू शकतील..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketal Agarwal Murder Case Director Sanjay Gupta Reaction: 'सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका...'; केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं, नेटकऱ्यांनी झोडून काढलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget