एक्स्प्लोर

कंगनाला कोर्टाचा दणका, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाचा निकाल कंगनाच्या विरोधात

कंगनाच्यावतीनं अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्यावतीनं अंधेरी कोर्टाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र याला अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला.

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (KANGANA RANAUT) कोर्टानं दणका देत तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणा-या कोर्टावर आता आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत या कोर्टातील आपली प्रकरणं दुस-या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे या कोर्टानं आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला, असा आरोप कंगनानं या अर्जातून केला होता. अंधेरी दंडाधिकारी कोर्टाविरोधातील या अर्जावर किला कोर्टातील मुख्य महावगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी झाली असता कोर्टानं कंगनाची ही मागणी फेटाळून लावली. ही मागणी फेटाळून लावताना मुख्य महानगर दंडाधिका-यांनी कंगनाविरोधातील कारवाई कायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला दिलेली स्थगिती उठवत यावर पुन्हा सुनावणी घेण्याचा कोर्टाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याच कोर्टात कंगनानं जावेद अख्तर यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करत तक्रार दिली आहे.

कंगनाच्या वतीनं अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्यावतीनं अंधेरी कोर्टाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र याला अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रत्येकवेळी नव्या सबबी सांगून निव्वळ कोर्टाचा वेळ फुकटचा घालवला जात असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच कंगनानं जावेद अख्तर यांच्याविरोधात अचानक दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं आपल्यावर केले आहेत. यामुळे आपली विनाकारण बदनामी झाली असून आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र त्यानंतरही कंगना सातत्यानं गैरहजर राहील्यानं न्यायालयानं पुन्हा अटक वॉरंट जारी करणारण्याची तंबी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget