एक्स्प्लोर

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: 'जिथे आहे, खूश आहे... अजिबात कमबॅक करणार नाही'; कोरियोग्राफर गीता माँचं बॉलिवूडला टाटा-बायबाय

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: गीता कपूरनं बॉलिवूडमधल्या तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केलेली.

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर (Choreographer Geeta Kapoor) म्हणजेच, चाहत्यांची लाडकी गीता माँ हिनं बॉलिवूडला अलविदा म्हटलं आहे. तिनं स्वतःच एका मुलाखतीत बोलताना याचं कारण सांगितलं आहे. गीता कपूरनं बॉलिवूडमधल्या तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केलेली. त्यासोबतच गीतानं बॉलिवूडमधले गाजलेले चित्रपट 'कुछ कुछ होता है' आणि 'दिल तो पागल है' सारख्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये फराह खानला असिस्ट केलेलं. गेल्या अनेक वर्षांपासून गीता कपूर टेलिव्हिजन डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून उपस्थित असायची. पण, आता तिनं थेट माझा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा कोणताही विचार नाही, असं म्हटलं आहे.  

नुकतीच गीता कपूरनं 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. गीता कपूरला या मुलाखतीत विचारण्यात आलं की, तू बॉलिवूडमध्ये कमबॅक कधी करणार? बरेच दिवस झाले आणि आता तुझा पुरेसा ब्रेकही झालाय, आता परत ये... तर यावर बोलताना गीता कपूर म्हणाली की, "नाही मला वाटतंय की, प्रत्येकानं एक पाऊल मागे हटलं पाहिजे आणि नव्या प्रतिभेला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे..." 

गीता माँनं सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं कारण 

गीता माँ पुढे म्हणाली की, "आता दुसऱ्यांनी पुढे जाण्याची आणि स्वतःचं नाव कमावण्याची वेळ आलीय. आम्हाला जेवढं या इंडस्ट्रीनं द्यायचं होतं आणइ जेवढं काम, पैसे आणि नाव द्यायचं होतं, आशीर्वाद द्यायचे होते, मला वाटतं ते सर्व मला मिळालं आहे. पण जर असं काही झालं की, माझी अतीव इच्छा असेल आणि मला ती संधी माझ्या हातून सोडायची नसेल, तर कदाचित ते काम मी करेल..." 

इंडस्ट्रीत कामाची खूपच कमतरताय...

गीता कपूर पुढे बोलताना म्हणाली की, "सध्या इंडस्ट्रीत कामाची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत इतर लोकांना संधी दिली पाहिजे. आजकाल, ते चित्रपट बनत नाहीत, जसे आमच्या काळात बनवले जात होते... जिथे 8-10 गाणी असायची. मोठी गाणी असायची. डान्स असलेली गाणी असायची. त्यामुळे एवढ्या कमी कामात आपण झडप घालायची आणि इतरांना काम करण्याची संधीही नाही द्यायची... त्यामुळे इतरांना संधी द्या. मी जिथे आहे, तिथेच खूश आहे." 

गीता कपूरनं पुढे सांगितलं की, "तिला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. तिला कॉपी-पेस्ट नाही तर सर्जनशील काम करायचे आहे. गीता कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने वयाच्या 17 व्या वर्षी सुरुवात केली. त्यानंतर ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली."

दरम्यान, गीता कपूरच्या इंडस्ट्रीतल्या कामाबाबत बोलायचं झालं तर, तिनं फराह खानला अनेक प्रोजेक्ट्समध्ये असिस्ट केलं होतं. ज्यामध्ये, 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है' याव्यतिरिक्त 'कभी खुशी कभी गम', 'मोहब्बतें', 'कल हो ना हो', 'मैं हूं ना' आणि 'ओम शांति ओम' यांसारख्या नावांचा समावेश आहे. गीता कपूर, फराह खानला आईचा दर्जा देते आणि तिलाच आपलं गुरूही मानते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pankaj Panchariya Post After Actor Tushar Ghadigaonkar Suicide: 'मृत्यूच्या काही दिवस आधी त्यानं माझ्याशी संपर्क केलेला, पण...' मराठी अभिनेत्यानं सांगितलं तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
Nawazuddin siddiqui on NEET protestors: आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
Deepali Sayyed on NEET Protest: 'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
Sonu Nigam On CJP Protest: CJP आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास सोनू निगमने दिला स्पष्ट नकार; प्रश्न विचारताच वैतागला, VIDEO
CJP आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास सोनू निगमने दिला स्पष्ट नकार; प्रश्न विचारताच वैतागला, VIDEO

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Embed widget