Chhaava Box Office Collection Day 34: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर ताबा; 34व्या दिवशीही दिग्गजांनी टेकले गुडघे, कमाई ऐकाल तर...
Chhaava Box Office Collection: विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं 34 व्या दिवशीही सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Chhaava Box Office Collection Day 34: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा' चित्रपटानं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान टिकवून आहे आणि चांगली कमाई करत आहे. 'छावा'नं निर्मात्यांना श्रीमंत बनवलं आहे आणि पाचव्या आठवड्यातही ते कोट्यवधींची कमाई करत आहेत. 'छावा'नं रिलीजच्या 34 व्या दिवशी म्हणजेच, पाचव्या बुधवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा' नं 34 व्या दिवशी किती पैसे जमवले?
'छावा' बॉक्स ऑफिसवर थांबायचं नाव घेत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट पाचव्या आठवड्यातच प्रेक्षकांची मनं जिंकत आहे आणि दररोज भरपूर कमाई करत आहे. यासोबतच 'छावा'च्या कलेक्शनमध्येही प्रचंड वाढत आहे. एवढंच नाही तर 'छावा' दररोज नवनवे विक्रमही रचत आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनलेल्या 'छावा'ची कमाई आता कमी होत चालली असली तरी 'छावा'नं त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त नफा कमावला आहे. 'छावा'च्या या कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर,
View this post on Instagram
- 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 180.25 कोटींची कमाई केली.
- तिसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 84.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
- चौथ्या आठवड्यात 'छावा'नं 55.95 कोटी रुपये कमावले.
- 29 व्या दिवशी चित्रपटानं 7.25 कोटी रुपये आणि 30 व्या दिवशी 7.9 कोटी रुपये कमावले.
- 31 व्या दिवशी 'छावा'नं 8 कोटींची कमाई केली आणि 32 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 2.65 कोटी रुपये होते.
- या चित्रपटानं 33 व्या दिवशी 2.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- आता 'छावा'च्या रिलीजच्या 34 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 34 व्या दिवशी 2.70 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'छावा'ची 34 दिवसांत एकूण कमाई आता 570.65 कोटी रुपये झाली आहे.
'छावा'नं 34 व्या दिवशीही सर्व चित्रपटांना टाकलं मागे
'छावा'ची क्रेझ कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. या चित्रपटानं 34 व्या दिवशीही कोटींची कमाई केली आणि यासोबतच तो इतर सर्व चित्रपटांना मागे टाकून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. 'छावा'नं 34 व्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
- 'छावा'नं 34 व्या दिवशी 2.70 कोटी रुपये कमावले आहेत.
- स्त्री 2 नं 34 व्या दिवशी 2.5 कोटी रुपये कमावले.
- उरी द सर्जिकल स्ट्राईकनं 34 व्या दिवशी 1.6 कोटी रुपये कमावले.
- पुष्पा 2 नं 34 व्या दिवशी 1.5 कोटी रुपये कमावले.
- बाहुबली 2 नं 34 व्या दिवशी 1.2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

