Chhaava Box Office Collection Day 1: 'छावा'च्या डरकाळीनं हादरलं बॉक्स ऑफिस; बंपर ओपनिंगपुढे भले-भले दिग्गज फेल, पहिल्या दिवशी किती कमावले?
Chhaava Box Office Collection Day 1: 'छावा'मध्ये विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली, तर रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली.

Chhaava Box Office Collection Day 1: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) बहुचर्चित चित्रपट 'छावा' (Chhaava) अखेर 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. विक्की कौशल, अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा हिस्टॉरिकल एपिक ड्रामा (Historical Epic Drama) असलेली फिल्म 'छावा'चीच (Chhaava Movie) रिलीजपूर्वीपासूनच खूप चर्चा रंगली होती. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग करणार हे फिक्स होतं. तसेच, वाढत्या क्रेझमुळे चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्येही (Chhaava Advance Booking) मोठी मुसंडी मारली होती. अशातच अखेर काल (शुक्रवारी, 14 फेब्रुवारी 2025) 'छावा' रिलीज झाला आणि त्याच्या डरकाळीनं बॉक्स ऑफिसवर (Chhaava Box Office Collection) जणू वादळंच आलं.
'छावा'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
विक्की कौशलच्या 'छावा'नं थिएटरमध्ये रिलीज होताच धुमाकूळ घातला आहे. या फिल्मला न केवळ क्रिटिक्सकडून शानदार रिव्यू मिळाला, तर ही फिल्म पहिल्या दिवशी थिएटरमध्ये जाऊन पाहणाऱ्या ऑडियन्सनही सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पाडला. फिल्ममध्ये विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली, तर रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली. तसेच, बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नानं मुघल बादशाह औंरगजेब रुपेरी पडद्यावर साकारला आहे. चित्रपटाची सर्वच स्टारकास्ट भारी असून सर्वांनी रुपेरी पडद्यावर भूमिका जीवंत करण्यासाठी जीव ओतल्याचं पाहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. अनेकांनी तर स्टार्सचा दमदार अभिनय इतका खराखुरा वाटतो की, अंगावर शहारे उभे राहतात असं म्हटलं आहे.
यासोबतच, 'छावा'नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत आणि वर्षातील सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रमही केला आहे. आता 'छावा'च्या रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
View this post on Instagram
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले आहेत. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात.
'छावा' ठरला 2025 मधील सर्वात मोठा ओपनर
'छावा'नं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिणेकडील चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनला आहे. या वर्षी एकूण आठ दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. जर आपण त्यांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोललो तर...
- 'छावा'नं पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली.
- विदामुयार्चीचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 26 कोटी होतं.
- स्काय फोर्सनं रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.30 कोटी रुपयांची कमाई केली.
- थंडेलनं पहिल्या दिवशी 11.5 कोटी रुपयांनी खातं उघडलं.
- 'देवा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.5 कोटींचा व्यवसाय केला.
- बॅडअस रविकुमारची पहिल्या दिवसाची कमाई 2.75 कोटी रुपये होती.
- 'इमर्जन्सी'नं पहिल्या दिवशी 2.5 कोटींचा गल्ला केला.
- आझादची पहिल्या दिवसाची कमाई 1.5 कोटी रुपये होती.
- 'लवयापा'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 1.25 कोटी रुपये होतं.
'छावा' विकेंडपर्यंत वसुल करणार आपलं भांडवल?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शिक 'छावा' चित्रपट शिवाजी सावंत यांची मराठी कादंबरी 'छावा'वरच आधारीत आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश विजन यांनी 'छावा'ची निर्मिती केली आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना, आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटानं ज्या वेगानं कमाई केली आहे ते पाहता, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचं बजेट परत मिळण्याची अपेक्षा आहे. 'छावा' शनिवार आणि रविवारी कसा परफॉर्म करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview
महत्त्वाच्या इतर बातम्या :























